VIDEO : एका स्कुटीवर बसले पाच तरुण, रस्त्यात केला भयानक स्टंट, व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पोलिस…
डीसीपी अशितोष यांनी सांगितलं की, आम्ही लवकरचं तरुणांना ताब्यात घेऊ, त्याचबरोबर हा व्हिडीओ जुना असल्याचं सुध्दा सांगितलं आहे.

दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये एका स्कुटीवर पाच तरुण बसले आहेत. त्याचबरोबर ते स्टंट करीत आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या एका मित्राने तो व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस तरुणांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे स्टंट केलेल्या तरुणांनी स्वत: चं तो व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी तरुणांवरती कारवाई करावी असं आवाहन केलं आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील असून पोलिस (Delhi Police) त्या तरुणांचा शोध घेत आहेत.
#Watch: नोएडा का एक वीडियो वायरल हुआ है जिसमें स्कूटी पर पांच युवक सवार होकर स्टंट करते हुए नजर आ रहे हैं। इसे धूम4 की शूटिंग बताते हुए सोशल मीडिया पर डाला गया है। नोएडा सेक्टर 24 थाना पुलिस की जांच में सामने आया कि संबंधित वीडियो सेक्टर-12 का है। #Noida #Viralvideo pic.twitter.com/xv2Ai6jvIk
— Hindustan (@Live_Hindustan) January 25, 2023
एकोणीस सेंकदाचा तो व्हिडीओ आहे. त्यामध्ये तरुण स्कुटीला लटकून प्रवास करीत आहेत. त्यानंतर त्यांच्यातला एक तरुण स्कुटीवर उभा राहत आहे. काही तरुणांनी तो व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून आयुक्तांपर्यंत पोहोचवला आहे. पोलिस स्कुटीच्या नंबरवरुन तरुणांचा शोध घेत आहेत. डीसीपी अशितोष यांनी सांगितलं की, आम्ही लवकरचं तरुणांना ताब्यात घेऊ, त्याचबरोबर हा व्हिडीओ जुना असल्याचं सुध्दा सांगितलं आहे.
युपी बाईकवरती काही तरुण रील्स तयार करीत होते. त्यावेळी त्या तरुणांवरती सुध्दा पोलिसांनी कारवाई केली होती. त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात आला होता.
