बेडूक आणि मुलीचं प्रेम, मैत्री! आजच्या दिवसातली Cute बातमी
या मुलीचे वय दोन वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मुलीने हा बेडूक आपल्या घरी आणलाय.

लहान मुले खेळण्यांशी खूप खेळतात, पण काही वेळा त्यांना लहान प्राण्यांचीही खूप आवड असते. अशीच एक गोष्ट समोर आलीये जिथे एका लहान मुलीची आणि बेडकाची मैत्री चर्चेत आहे. या दोघांचं प्रेम हे कदाचित जगातलं सर्वात अनोखं प्रेम आहे. त्यांची मैत्री इतकी घट्ट आहे की दोघंही एकत्र उठून खाणं-पिणं करतात. हा बेडूक एक प्रकारे या मुलीचा पाळीव बेडूक आहे. बेडूकही मुलीला तशीच वागणूक देतो, तोही मैत्री दाखवून देतो.
ही मुलगी दोन वर्षांची आहे. खरं तर ही मुलगी फ्लोरिडाची आहे. जुलियाना ॲलन असं या मुलीचं नाव आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी ही मुलगी आपल्या आईसोबत सुपरमार्केटमध्ये असलेल्या एका दुकानात गेली होती, तेव्हा हा बेडूक तिथे दिसला.

Friendship of girl and the frog
सुरुवातीला मुलीच्या आईला हे विचित्र वाटलं, पण शेवटी हा बेडूक 40 डॉलर म्हणजेच जवळपास तीन हजार रुपयांना विकत घेण्यात आला. या मुलीचे वय दोन वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मुलीने हा बेडूक आपल्या घरी आणलाय.
बेडकाचे नाव जॉर्ज असे होते. आता ते एकमेकांशिवाय अजिबात राहत नाहीत. खाण्यापासून ते झोपण्यापर्यंत सर्व काही ते एकत्र करतात, एकमेकांसोबत राहतात. ज्युलियाना टीव्ही बघत असताना बेडूक तिच्या खांद्यावर उडी मारून बसतो, दोघे मिळून नाश्ता करतात. गंमत म्हणजे मुलगी बाहेर गेल्यावर बेडूकही तिच्यासोबत चालतो.
सध्या बेडूक कुटुंबातील सदस्य बनलाय. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये बेडूक कधी मुलीच्या खांद्यावर बसलेला असतो. तर कधी मुलगी काहीतरी करत असताना आणि बेडूक लक्षपूर्वक पाहत असतो. मुलीच्या घरात आधीच कुत्रा आणि मांजर पाळीव प्राणी असून आता बेडूकही तिच्या कुटुंबातील सदस्य झाला आहे.
