Video : माशाच्या डोक्यावर बसून बेडकाची मस्त सैर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सफेद माशाच्या शेजारी अन्य रंगबेरंगी मासेही पाण्यात पोहताना दिसत आहेत. सफेद, पिवळा, नारंगी, काळा असे विविध रंगाचे मासे पाण्यात पोहत आहेत.

Video : माशाच्या डोक्यावर बसून बेडकाची मस्त सैर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
माशाच्या डोक्यावर बसून बेडकाची सैर
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 20, 2022 | 7:11 PM

सोशल मीडियावर दररोज प्राण्याचे, पक्षांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते लोकांच्या पसंतीस पडतात. लोकांमध्ये अशा व्हिडिओंबाबत खूप उत्सुकता असते. असे व्हिडिओ लोकांचे मूड फ्रेश करतात. असाच मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. मासा आणि बेडकाचा (Fish and Frog) एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ युजर्सच्या खूपच पसंतीस उतरला आहे.

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक सफेद रंगाचा मासा पाण्यात पोहताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा एकटा पोहत नाही आहे, तर त्याच्या डोक्यावर एक बेडूक बसले आहे. हे बेडूक माशाच्या डोक्यावर बसून मस्तपैकी सैर करत आहे. संधीचा फायदा घेत बेडूक माशाच्या डोक्यावर बसून मस्त पाण्यात सैर करण्याचा आनंद लुटत आहे.

सफेद माशाच्या शेजारी अन्य रंगबेरंगी मासेही पाण्यात पोहताना दिसत आहेत. सफेद, पिवळा, नारंगी, काळा असे विविध रंगाचे मासे पाण्यात पोहत आहेत. या माशांनी बेडकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र बेडूक वाचला.

व्हिडिओला अडीच लाखाहून अधिक व्ह्यूज

मासा आणि बेडकाची ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. दोन वेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांचा हा व्हिडिओ युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओला 2.50 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बेडकाला फ्री रायडिंग आणि फ्री सुरक्षा दोन्ही मिळत आहे.