ट्विट्समुळे त्याला अटक झाली, 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

दहशतवादी विचारसरणीला आश्रय देणे, सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे आणि दहशतवादाला मदत करणे, त्याला प्रोत्साहन देणे यासाठी दोषी ठरविण्यात आलंय.

ट्विट्समुळे त्याला अटक झाली, 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
old man got arrestedImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 2:04 PM

ही बातमी फार महत्त्वाची आहे. गेल्या सात वर्षात एका व्यक्तीने केलेल्या ट्विट्समुळे त्याला अटक करण्यात आलीये. इतकंच काय तर त्याला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीये. होय! सौदी अरेबियाने 72 वर्षीय अमेरिकन नागरिकाला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये. अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या एका 72 वर्षीय व्यक्तीला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती त्याच्या मुलाने दिली आहे. अमेरिकेतून सौदी सरकारवर टीका करणाऱ्या ट्विट्ससाठी फ्लोरिडाच्या एका निवृत्त प्रकल्प व्यवस्थापकाला सौदी अरेबियात 16 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि छळ करण्यात आला, असा आरोप या मुलाने केलाय.

72 वर्षीय साद इब्राहिम अलमादी हे अमेरिका आणि सौदी अरेबियाचे दुहेरी नागरिक आहेत. त्यांचा मुलगा इब्राहिम याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबियात एका कुटुंबाला भेट देताना त्यांना अटक करण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

साद इब्राहिम अलमादी यांच्या मुलाने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जोश रोगिन यांच्याशी बातचीत केली. मुलाच्या म्हणण्यानुसार, अलमादी यांना गेल्या सात वर्षांत 14 ट्विटसाठी अटक करण्यात आली होती, ज्यात त्यांनी सौदी सरकारचे राजकीय निर्णय आणि भ्रष्टाचारावर टीका केली होती.

अलमादी यांच्याकडे अमेरिका-सौदी असे दुहेरी नागरिकत्व आहे आणि जेव्हा त्यांनी हे ट्विट केले तेव्हा ते फ्लोरिडामध्ये राहत होते.

त्यांनी सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्याबद्दलही ट्विट केले होते. पत्रकार जमाल खशोगी यांची इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात 2 ऑक्टोबर 2018 रोजी हत्या करण्यात आली होती.

आता साद इब्राहिम अलमादी यांना सौदी अरेबियात कैदेत ठेवण्यात येणारे. ‘द गार्डियन’ला दिलेल्या निवेदनात इब्राहिमने म्हटले आहे की, सौदीच्या एजंटांनी विमानतळावरून वडिलांचे अपहरण केले होते आणि फोन तपासत असताना त्यांना एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते.

द पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अलमादी यांच्यावर दहशतवादी विचारसरणीला आश्रय देणे, सौदी अरेबिया सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे आणि दहशतवादाला मदत करणे, त्याला प्रोत्साहन देणे यासाठी दोषी ठरविण्यात आलंय.

त्याच्या तुरुंगवासाव्यतिरिक्त सौदी अरेबियाने 16 वर्षांची प्रवासबंदीही घातली आहे, म्हणजे त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच अखेर त्याला अमेरिकेत परतण्याची परवानगी मिळेल.

मार्चमध्ये इब्राहिमच्या कुटुंबीयांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क साधला , इब्राहिमने तक्रार केली की, सौदी सरकार आपल्या वडिलांवर अत्याचार करत आहे. ट्विट्समुळे झालेला हा प्रकार आणि अलमादी यांना केली गेलेली अटक सध्या चर्चेत आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.