AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Highwayवर Short video करणं तरुणाला पडलं महागात, ‘अशी’ स्टंटबाजी करताना शंभरवेळा करेल विचार!

Boy funny video : आजकाल तरुणांमध्ये शॉर्ट (Shorts) व्हिडिओची वेगळीच क्रेझ (Craze) पाहायला मिळत आहे. एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. हायवेवर व्हिडिओ बनवणाऱ्याला व्हिडिओ बनवणे महागात पडले आहे.

Highwayवर Short video करणं तरुणाला पडलं महागात, 'अशी' स्टंटबाजी करताना शंभरवेळा करेल विचार!
हायवेवर शॉर्ट व्हिडिओ करताना तरुणाची झाली फजिती
| Updated on: Feb 28, 2022 | 11:27 AM
Share

Boy funny video : आजकाल तरुणांमध्ये शॉर्ट (Shorts) व्हिडिओची वेगळीच क्रेझ (Craze) पाहायला मिळत आहे. हे करताना ते इतके देहभान विसरून करतात की कधीतरी भलतेच काहीतरी घडते. त्यांना मागेपुढे काहीच दिसत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. हायवेवर व्हिडिओ बनवणाऱ्याला व्हिडिओ बनवणे महागात पडले आहे. लोक कुठेही व्हिडिओ करायला लागतात. त्यामुळे कधी-कधी अशा घटना घडतात, की मग त्यांचे हसे होते. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत घडला आहे. जिथे हायवेवर एक मुलगा व्हिडिओ बनवत आहे. दरम्यान, त्याच्यासोबत असे काही घडते, की हसू आल्याशिवाय राहत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की मुलगा रस्त्याच्या कडेला बाइक लावून व्हिडिओ शूट करत आहे.

शर्ट घेऊन निघून जातो

क्लिप पाहत असताना तो रील किंवा छोटा व्हिडिओ बनवत असल्याचे दिसते. व्हिडिओग्राफी करताना तो मुलगा अशा रीतीने त्यात हरवून जातो, की त्याला पुढचे काही कळत नाही. दरम्यान, मुलाने शर्ट काढून हवेत फेकला. पण तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याचा शर्ट पकडला आणि तो तिथून एका सेकंदात निघून गेला. व्हिडिओमध्ये हे सर्व पाहणे फारच मजेशीर आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडिओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. यूझर्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत तसेच शेअरही करत आहेत. या व्हिडिओला 60 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. काही लोक म्हणतात, की जे स्मार्ट होतात त्यांच्या बाबतीतही असेच घडते. काही यूझर्स असेही आहेत जे म्हणत आहेत, की गरीबाचा शर्ट कोणी काढून घेतला, आता तो घरी कसा जाणार? कमेंट सेक्शनमध्ये हसणारे इमोजीही पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

आणखी वाचा :

Fitness video : आहे तर चिमुरडा पण कसा उडवतो ‘बार’? तुम्हालाही प्रोत्साहित करेल

इथून निघून जा नाहीतर…; चिमुरडीचा रुद्रावतार! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Video होतोय Viral

Magic pencil मिळाल्यावर काय करतो हा मुलगा? पाहा Interesting viral video

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.