तरुणींमध्ये वाढतेय ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची क्रेझ, वेगवेगळ्या आऊटफिट्ससोबत अशा प्रकारे करू शकता कॅरी!

एक काळ असा होता, जेव्हा मुलींमध्ये सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने घालण्याची क्रेझ होती. पण, आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या ड्रेसनुसार कृत्रिम अर्थात इमिटेशन दागिने घालणे आवडते. आजकाल तरुणींमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची खूप क्रेझ आहे.

तरुणींमध्ये वाढतेय ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची क्रेझ, वेगवेगळ्या आऊटफिट्ससोबत अशा प्रकारे करू शकता कॅरी!
Jwellery

मुंबई : एक काळ असा होता, जेव्हा मुलींमध्ये सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने घालण्याची क्रेझ होती. पण, आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या ड्रेसनुसार कृत्रिम अर्थात इमिटेशन दागिने घालणे आवडते. आजकाल तरुणींमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची खूप क्रेझ आहे. हे दागिने स्टर्लिंग चांदीपासून बनवले जातात. ज्यामुळे, ते जास्त चमकत नाही किंवा खूप डल देखील वाटत नाही. त्यांचा रंग बराच काळ अबाधित राहतो.

या नव्या युगातील दागिन्यांचा लूक पारंपरिक दागिन्यांसारखाच आहे. पण ते भारतीय ते पाश्चिमात्य पोशाखांसह सहजपणे वापरले जाऊ शकतात. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची खास गोष्ट म्हणजे त्याच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. हे दागिने परिधान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती येथे जाणून घ्या…

जाणून घ्या नव्या स्टाईल :

  1. जर तुम्ही कुर्ती किंवा सलवार सूट परिधान करत असाल, तर तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आरामात परिधान करू शकता. या लूकवर झुमके, नेकपीसपासून बांगड्यापर्यंत सर्व काही परिधान करता येते. या दागिन्यांची खास गोष्ट म्हणजे साध्या कुर्तीवर देखील हे परिधान करून तुम्ही स्टायलिश लूक मिळवू शकता.
  2. जर तुम्ही वेस्टर्न ड्रेस ट्राय करत असाल, तर तुम्ही त्यासोबत एक मोठा पेंडेंट नेकपीस घालू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक शोभून दिसतो. आजकाल बाजारात ऑक्सिडाइज्ड बांगड्या आणि अंगठ्याही उपलब्ध आहेत. आपण त्यांना देखील परिधान करू शकता.
  3. जर तुम्ही राजस्थानी शैलीमध्ये पारंपारिक ड्रेस परिधान करत असाल, तर तुम्ही ऑक्सिडाइज्ड चोकर नेकवेअर, मांगटिका, रिंग्ज आणि बांगड्या घालून पारंपरिक लूक मिळवू शकता. या व्यतिरिक्त, जरी तुम्ही साडी नेसली असेल, तरी तुमचा लूक भव्य दिसण्यासाठी ऑक्सिडाइज्ड नेकपीस आणि झुमके पुरेसे आहेत.
  4. जीन्ससह देखील ऑक्सिडाइज्ड दागिने चांगले दिसतात. जीन्स टॉप आणि जीन्स कुर्तीसह ऑक्सिडाइज्ड कानातले, नेकपीस इत्यादी परिधान करून तुम्ही परिपूर्ण लूक मिळवू शकता. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये हा लूक खूप प्रसिद्ध आहे.
  5. ऑक्सिडाइज्ड कानातले आणि अंगठी गाऊन बरोबर खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही नीट बघितले तर, तुम्हाला अनेक अभिनेत्री असा लूक कॅरी करताना दिसतील. याशिवाय, ऑक्सिडाइज्ड अँकलेट्स आणि टो-रिंग देखील खूप सुंदर दिसतात. आपण ते देखील कॅरी करू शकता.

हेही वाचा :

Yami Gautam: यामी गौतमची ‘लाख’मोलाची गुलाबी जरीची साडी, किंमत ऐकून तु्म्ही व्हाल थक्क!

Fashion Tips : पावसाळ्याच्या हंगामात कोणत्या प्रकारचे कापडे टाळावे? वाचा!

Expensive Lehenga : सोशल मीडियावर माधुरीच्या ‘टाय-डाय’ लेहेंग्याची चर्चा, या पेहरावाची किंमत माहितेय का?

Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित, इतक्या पैशात करता येईल ‘युरोप’ ट्रीप!  

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI