Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित, इतक्या पैशात करता येईल ‘युरोप’ ट्रीप!  

फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या फॅशन सेन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Urvashi rautela balmain paris)

Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित, इतक्या पैशात करता येईल ‘युरोप’ ट्रीप!  
अभिनेत्री उर्वशी रौतेला 'ब्लॅक रोज' चित्रपटाद्वारे तेलगूमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल गाणे प्रसिद्ध झाले आहे.

मुंबई : फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या फॅशन सेन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोश मीडियावर देखील बरीच चर्चेत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे (Urvashi rautela balmain paris jacket costs more than your European trip).

‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ उर्वशी रौतेलाने नुकतेच इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या इंस्टाग्राम पोस्टमधील तिचे जॅकमगिग ब्लेझरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर गायक आणि रॅपर योयो हनी सिंग याची बहीण स्नेहा सिंग हिला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अबब! एव्हढे महागडे ब्लेझर

स्नेहा सिंगने गेल्या महिन्यात निखिल शर्माशी विवाह केला होता. या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेलाने ‘बामाईन पॅरिस’चे ब्लेझर परिधान केले होते. या ब्लेझरची किंमत जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त आहे. नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते. ती बऱ्याचदा अशा सुपर हॉट आणि महागड्या फॅशनेबल लूकमध्ये दिसत असते.

 (Urvashi rautela balmain paris jacket costs more than your European trip)

चित्रपटांच्या रांगा…

वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर, उर्वशी रौतेला सध्या तिच्या आगामी ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरीजचे शुटिंग करण्यात व्यस्त आहे. या वेब सीरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हूडा, उर्वशीसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान याच्यासोबत एका आंतराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये देखील काम करणार आहे, ज्यातही ती सध्या खूप व्यस्त आहे. दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणारा थ्रिलर चित्रपट ‘ब्लॅक रोज’ आणि ‘तिरुत्तू पायले 2’च्या हिंदी रिमेक सारखे अनेक बिग बजेट चित्रपट उर्वशी रौतेलाकडे आहेत.

जिओ स्टुडिओबरोबर 3 चित्रपट साईन!

‘इंस्पेक्टर अविनाश’ ही नीरज पाठक दिग्दर्शित पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांची खरीखुरी जीवन कथा आहे. तर, सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला हिने जिओ स्टुडिओबरोबर देखील काही प्रोजेक्ट साईन केले आहेत.

आतापर्यंत ‘व्हर्जिन भानुप्रिया’, ‘पोरबाशिनी’, ‘ऐरावत’ आणि अशा बऱ्याच प्रोजेक्टमध्ये उर्वशी रौतेलाने काम केले असून, यातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. याशिवाय उर्वशीने ‘लव्ह डोस’, ‘तेरी लोड वे’, ‘एक डायमंड दा हार’ या सारख्या अनेक हिट म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे.

(Urvashi rautela balmain paris jacket costs more than your European trip)

हेही वाचा :

उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा, 32 लाखांचा गाऊन घालून 15 मिनिटांसाठी आली, चार कोटी घेऊन गेली