उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा, 32 लाखांचा गाऊन घालून 15 मिनिटांसाठी आली, चार कोटी घेऊन गेली

सध्या सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाच्या या ड्रेसची प्रचंड चर्चा रंगली आहे. उर्वशीने इन्स्टाग्रामवर या गाऊनमधील काही फोटो शेअर केले होते. | Urvashi Rautela red gown

उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा, 32 लाखांचा गाऊन घालून 15 मिनिटांसाठी आली, चार कोटी घेऊन गेली

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. (Urvashi Rautela Looks Exquisite In A Red Sequinned Gown)

नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या एका पार्टीत उर्वशी रौतेलाने हजेरी लावली होती. या पार्टीत ती केवळ 15 मिनिटांसाठी हजर होती. यासाठी उर्वशी रौतेलाला थोडेथोडके नव्हे तर चार कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्याहून थक्क करणारी बाब म्हणजे या पार्टीत उर्वशी रौतेलाने परिधान केलेला ड्रेस.

सध्या सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाच्या या ड्रेसची प्रचंड चर्चा रंगली आहे. उर्वशीने इन्स्टाग्रामवर या गाऊनमधील काही फोटो शेअर केले होते. लाल रंगाच्या या बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचे सौदर्यं नेहमीपेक्षा अधिक खुलून आले आहे. मायकल सिनको या डिझायनरने उर्वशीचा हा ड्रेस डिझाईन केला होता. हा गाऊन तयार करण्यासाठी तब्बल 150 तास लागले. तर या गाऊनची किंमत 32 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.

यापूर्वीही उर्वशी रौतेला तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी गायिका नेहा कक्कड हिच्या लग्नात उर्वशीने परिधान केलेला लेहंगाही चर्चेचा विषय ठरला होता. यासाठी चाहत्यांनी तिचे बरेच कौतुकही केले होते.

इतर बातम्या:

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे बनला ‘साईशा शिंदे’! सोशल मीडियाद्वारे केला खुलासा..

लडाखमध्ये मायनस 33 डिग्री तापमान; अमिताभ बच्चन म्हणतात थर्मल सूट घालूनही…

‘शनाया’च्या आयुष्यात खऱ्याखुऱ्या ‘कुणाल’ची एंट्री, पाहा रसिकाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती

(Urvashi Rautela Looks Exquisite In A Red Sequinned Gown)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI