VIDEO: महिलेने स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली अन् काय घडलं? व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके भावनिक असतात, जे पाहून डोळ्यात अश्रू येतात. दुसरीकडे, असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर आपण खळखळून हसतो. असे काही व्हिडिओ देखील आहेत जे प्रथम पाहून आश्चर्यचकित होतात परंतु नंतर आपण आपले हसणे नियंत्रित करु शकत नाहीत

VIDEO: महिलेने स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली अन् काय घडलं? व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Trending pool video

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भावनिक असतात, जे पाहून डोळ्यात अश्रू येतात. दुसरीकडे, असे काही व्हिडीओ आहेत जे पाहिल्यानंतर आपण खळखळून हसतो. असे काही व्हिडीओ देखील आहेत जे प्रथम पाहून आश्चर्यचकित होतात परंतु नंतर आपण आपले हसणे नियंत्रित करु शकत नाहीत. हा व्हिडीओ व्हायरल होताना पाहून तुम्हाला हसू फुटेल. या व्हिडीओमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेचे काय झाले ते खरोखरच हास्यास्पद आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका स्विमिंग पूलचा आहे. जिथे एक महिला स्विमिंग करण्यासाठी डायव्हिंग बोर्डवरुन उडी मारते. पण यादरम्यान त्या महिलेसोबत असे काही घडते की आपण आपलं हसणे थांबवणे कठीण आहे. व्हिडीओमध्ये, एक महिला स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी डायविंग बोर्डवर उभी असल्याचे दिसते.

व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचा संकेत मिळताच ती पूलमध्ये उडी मारते. पण, जे घडले ते पाहिल्यानंतर, व्हिडीओ बनवणारी व्यक्ती आणि आजूबाजूला उभे असलेले लोकही हसायला लागले. खरं तर, त्या महिलेने पूलमध्ये उडी मारताच तिचा विग तिच्या डोक्यावरुन उतरला आणि डायविंग बोर्डवर पडला. हा व्हिडीओ पाहून तुम्ही तुमचे हास्य नियंत्रित करु शकणार नाही.

व्हिडीओ पाहा-

हा मजेदार व्हिडीओ ट्विटरवर Hold My Beer नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यांच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘तिला केस ओले करायचे नव्हते.’ लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. आतापर्यंत ते 3.6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक ही व्हिडीओ क्लिप केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. हा मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हालाही आनंद होईल. हा मनोरंजक व्हिडीओ आपला दिवस बनवण्यासाठी पुरेसा आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: गुजरातमध्ये भररस्त्यात सिंहांचा गाईवर हल्ला, नागरिक गाडीचे हॉर्न वाजवत राहिले पण शिकार केलीच

Video | तरुणाची हँडलकडे पाठ, तरीही चावलतोय शिताफीने बाईक, चक्रावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI