
Gariaband Dance Video : सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच आता छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील एका गावात झालेल्या अश्लील नृत्य कार्यक्रमामधील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत असलेल्या या प्रकरणात मैनपूर येथील उपविभागीय दंडाधिकारी तुलसीदास मरकाम यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले असून आयोजन समितीच्या 14 सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई
देवभोग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरमाल गावात गेल्या आठवड्यात एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अत्यंत अश्लील नृत्य सादर करण्यात आल्याचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये मंचावर नृत्य करणाऱ्या तरुणी उघडपणे अश्लील हावभाव करताना आणि खासगी अवयव दाखवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान एसडीएम तुलसीदास मरकाम स्वतः तिथे उपस्थित होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये एसडीएम तुलसीदास मरकाम आरामात खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. ते आपल्या मोबाईल फोनवर अश्लील नृत्याचे चित्रीकरण करतानाही दिसत आहेत. अशातच ते काही वेळानंतर डान्स करणाऱ्या महिलेवर पैसे उडवताना दिसत आहेत. याच व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारी देखील पैसे उडवत आणि व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एसडीएम तुलसीदास मरकाम यांनी आपण कार्यक्रम बंद करण्यासाठी तेथे गेलो होतो असे सांगितले. कार्यक्रम इतका अश्लील असूनही तो तात्काळ बंद का करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला Youtube वर जाऊन सर्चमध्ये Gariaband Viral Dance Video असं टाकावं लागेल
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
गरियाबंद जिल्हाधिकारी भगवान सिंह उइके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी असलेल्या तुलसीदास मरकाम यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले असून, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
ओडिशातून बोलावलेल्या नर्तिका
या कार्यक्रमासाठी डान्स करणाऱ्या तरुणींना ओडिशातून बोलावण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.