हे रे पठ्ठ्या! आज कळला जिराफच्या उंच मानेचा खरा उपयोग, व्हिडीओ बघून खूप हसाल

आता बघा ना जिराफ भांडताना तुम्ही कधी पाहिलंय का? जिराफ इतके उंच उंच, कधी विचार केलाय का इतकं उंच शरीर घेऊन ते नेमके भांडत कसे असतील? त्यांना अवघडल्यासारखं होत नसेल का एवढी उंच मान घेऊन एकमेकांच्यात भांडायला?

हे रे पठ्ठ्या! आज कळला जिराफच्या उंच मानेचा खरा उपयोग, व्हिडीओ बघून खूप हसाल
Giraffe fight video
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 25, 2023 | 11:44 AM

व्हायरल व्हिडीओमध्ये सगळ्यात भारी काय असेल तर ते असतं प्राण्यांचे व्हिडिओ. यातसुद्धा आपण खूपदा फक्त कुत्र्यांचे व्हिडीओ पाहतो, फार तर फार मांजरांचे व्हिडीओ. इतर प्राणीही बरेचदा पाहतो पण ठराविकच! आता बघा ना जिराफ भांडताना तुम्ही कधी पाहिलंय का? जिराफ इतके उंच उंच, कधी विचार केलाय का इतकं उंच शरीर घेऊन ते नेमके भांडत कसे असतील? त्यांना अवघडल्यासारखं होत नसेल का एवढी उंच मान घेऊन एकमेकांच्यात भांडायला? हा व्हिडीओ बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडीओ बघून मिळतील.

अनेकवेळा शिकार आणि शिकारी यांच्यात भयंकर भांडण होत असल्याचेही दिसून येते, पण तुम्ही कधी जिराफची लढाई पाहिली आहे का? होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. जिराफ तुम्ही पाहिला असेलच. हा पृथ्वीवरील सर्वात उंच सस्तन प्राणी आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रौढ जिराफच्या फक्त पायांची लांबी सुमारे 6 फूट असते. याशिवाय त्याच्या मानेची लांबीही सुमारे ६ फूट आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन जिराफ एकमेकांना लांब मानेने मारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते एकमेकांच्या मानेवर कसे जोरात वार करत आहेत. एवढी मजेशीर लढाई तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 53 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी ‘अशी लढाई मी कधीच पाहिली नाही’ असं म्हणतंय, तर कुणी ‘ते भांडत नाहीत तर खेळत आहेत’ असं म्हणत आहेत. त्याचप्रमाणे एका युजरने ‘ही मजेदार लढाई आहे’, असे लिहिले आहे, तर एका युजरने लिहिले आहे की ‘जिराफच्या लांब मानेचा काय फायदा आहे हे मला जाणून घ्यायचे आहे?’.

जिराफबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहित असतील. असे म्हटले जाते की जिराफ 24 तासात जास्तीत जास्त 30 मिनिटे झोपतात.