AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसमध्ये जागा पकडायला गेली, मुलांनाही मागे टाकलं! म्हारी छोरी क्या छोरेसे कम है के?

या व्हिडिओमध्ये काही लोक जीव धोक्यात घालून बसमध्ये चढताना दिसत आहेत. गर्दीमुळे वेळेत बस न मिळाल्यास बसस्थानकावर थांबावे लागेल, असे नागरिकांना वाटते. यामुळे लोक जबरदस्तीने बसमध्ये प्रवेश करतायत. यावेळी प्रवाशांना रोखणे अवघड झाले.

बसमध्ये जागा पकडायला गेली, मुलांनाही मागे टाकलं! म्हारी छोरी क्या छोरेसे कम है के?
girl climbing on vehicleImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 04, 2023 | 6:26 PM
Share

मुंबई: इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक जीव धोक्यात घालून बसमध्ये चढताना दिसत आहेत. गर्दीमुळे वेळेत बस न मिळाल्यास बसस्थानकावर थांबावे लागेल, असे नागरिकांना वाटते. यामुळे लोक जबरदस्तीने बसमध्ये प्रवेश करतायत. यावेळी प्रवाशांना रोखणे अवघड झाले. हरयाणातील बसस्टँडवर लोक बसमध्ये लटकलेले दिसतात. हे खूप धोकादायक ठरू शकते आणि लोकांनी या प्रकारच्या प्रवासापासून दूर राहिले पाहिजे.

हा व्हिडिओ जवळपास 5-6 महिने जुना असला तरी परीक्षेच्या दिवसात तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सीईटी परीक्षेमुळे हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती. प्रवाशांना बसच्या दारात उभे ठेवण्यात आले होते. या दरम्यान एका मुलीने असे काही केले ज्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. चालत्या बसमध्ये चढण्यासाठी एक मुलगी टायरच्या वरच्या खिडकीचा आधार घेत होती. मात्र, खिडकीतील कोणीतरी मुलीचा हात पकडून आत ओढला.

View this post on Instagram

A post shared by ghantaa (@ghantaa)

धोकादायक स्टंटमुळे जीव जाऊ शकतो, व्हिडिओ व्हायरल

या दरम्यान मुलगी गंभीर जखमी झाली असती किंवा तिचा मृत्यूही झाला असता. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. जेव्हा लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युजरने लिहिले की, ‘हरियाणा की छोरी. टीप: हा व्हिडिओ सीईटी परीक्षेचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की, आपला जीव धोक्यात घालू नका. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत, तर लाखो व्ह्यूज आले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने हरियाणवी भाषेत लिहिले की, ‘म्हारी छोरी क्या छोरोसे कम है?’

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी