AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेळीचा smoke करतानाचा Video Viral; लोक म्हणतायत, आधीच्या जन्मी नक्की व्यसनी व्यक्ती असावी!

Goat funny video : तुम्ही माणसांना धुम्रपान (Smoking) करताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला (Animal) धुराचे लोट उडवताना पाहिलं आहे का? तुमचे उत्तर नाही असेच असेल. मात्र सध्या एका शेळीच्या (Goat) व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय.

शेळीचा smoke करतानाचा Video Viral; लोक म्हणतायत, आधीच्या जन्मी नक्की व्यसनी व्यक्ती असावी!
नाकातून घेत तोंडावाटे धूर काढणारी शेळी
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 15, 2022 | 3:06 PM
Share

Goat funny video : तुम्ही माणसांना धुम्रपान (Smoking) करताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला (Animal) धुराचे लोट उडवताना पाहिलं आहे का? साहजिकच तुमचे उत्तर नाही असेच असेल. मात्र सध्या एका शेळीच्या (Goat) व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेळी अनोख्याच पद्धतीने धुम्रपान करत असल्याचे दिसत आहे. ती ज्या पद्धतीने धुराचा वास घेत आहे आणि तोंडातून धूर बाहेर काढत आहे ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ नेपाळचा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा 16 सेकंदाचा व्हिडिओ जवळपास 9 लाखवेळा पाहिला गेला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका मंदिरात शूट केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिवा आणि अगरबत्तीच्या स्टँडजवळ एक शेळी उभी असल्याचे तुम्ही पाहू शकता.

नाकातून ओढून तोंडातून काढत आहे धूर

अगरबत्तीतून निघणारा धूर ही शेळी नाकातून ओढून तोंडातून काढत आहे. हा व्हिडिओ खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण तुम्ही याआधी कोणत्याही प्राण्याला असे करताना पाहिले नसेल. ही शेळी ज्या पद्धतीने धूर बाहेर काढते, ते पाहून एखाद्या व्यसनीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

ट्विटरवर शेअर

@AvatarDomy2 या मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर शेळीचा हा अद्भुत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की नेपाळमधील एक बकरी अगरबत्तीचा धूर श्वासात घेते आणि तोंडातून सोडते. या पोस्टला 18 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 3 हजार लोकांनी रिट्विट केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय शेकडो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरचे म्हणणे आहे, की असे दिसते की मागील जन्मात ही शेळी मानव असेल आणि तिला सिगारेटचे व्यसन असेल.

आणखी वाचा :

पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू

Dosa आणि Kurkureचं खतरनाक Combination; यूझर्सच्या रागाचा वाढला पारा, म्हणतायत…

…म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर ‘या’ मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट