AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dosa आणि Kurkureचं खतरनाक Combination; यूझर्सच्या रागाचा वाढला पारा, म्हणतायत…

Weird Food Combinations : सोशल मीडियावर (Social Media) पदार्थांचे (Food) विचित्र प्रयोग आणि त्याचे व्हिडिओ यांचा पूर आला आहे. आता एका विक्रेत्याने कुरकुरेसोबत डोसा (Dosa made with Kurkure) बनवला आहे, जो पाहून लोक दुकानदाराला शिव्या देत आहेत.

Dosa आणि Kurkureचं खतरनाक Combination; यूझर्सच्या रागाचा वाढला पारा, म्हणतायत...
विक्रेत्यानं बनवलेला कुरकुरे डोसा
| Updated on: Feb 15, 2022 | 1:44 PM
Share

Weird Food Combinations : सोशल मीडियावर जणू चटकदार पाककृतींचा ट्रेंडच सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) खाद्यपदार्थांचे (Food) विचित्र प्रयोग आणि त्याचे व्हिडिओ यांचा पूर आला आहे. ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेते क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली आयकॉनिक खाद्यपदार्थांशी खेळताना दिसतात. सध्या ‘मॅगी आईस्क्रीम रोल’च्या रेसिपीबाबत लोकांचा संताप शांत होत नाही तोच एका विक्रेत्याने दक्षिण भारतीय पदार्थ डोसा असा काही बनवला, की लोकांना संताप आवरणे कठीण होऊन हेले आहे. या विक्रेत्याने कुरकुरेसोबत डोसा (Dosa made with Kurkure) बनवला आहे, जो पाहून लोक दुकानदाराला शिव्या तर देत आहेतच, पण या गुन्ह्याला नरकातही जागा मिळणार नाही, असेही गंमतीत बोलत आहेत. एकूणच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोसाप्रेमींना रागावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे.

विचित्र डोशाची रेसिपी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की विक्रेता पिठात घेऊन तव्यावर डोसा बनवण्यास सुरुवात करतो. यानंतर चिरलेला कांदा, चीज आणि नंतर चटणी घालून मिक्स करतो. यानंतर मसाल्याची ग्रेव्ही घालून मिक्स करतो. यानंतर विक्रेता डोशामध्ये जे काही टाकलो, ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. विक्रेता मसाल्यावर भरपूर कुरकुरे टाकतो आणि लोकांना चटणी आणि सांबार सोबत देतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

या विचित्र कॉम्बिनेशन डोसा रेसिपीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर thegreatindianfoodie या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘चटपटा डोसा खाओगे, तो ओरिजनल वाला भूल जाओगे. ट्राय करो स्पेशल कुरकुरे डोसा.’ काही तासांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 1500हून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर कॉमेंट सेक्शनमधील प्रत्येकजण विक्रेत्यावर जोरदार टीका करत आहे.

‘पारंपरिक पदार्थांशी खेळ’

एका यूझरने कमेंट करत लिहिले, की दिल्लीतील विक्रेत्यांची कृती पाहून माझा माणुसकीवरचा विश्वास उडत आहे. त्याच वेळी, आणखी एक यूझरने म्हटले, की रस्त्यावरील खाद्यपदार्थ विचित्र आहेत, आता हे विक्रेते पारंपरिक खाद्यपदार्थांशी खेळत आहेत. आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की अहमदाबादनंतर दिल्ली हे एकमेव ठिकाण आहे जिथे खाद्यपदार्थांवर विचित्र प्रयोग होत आहेत. एकंदरीत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स संतापले आहेत.

आणखी वाचा :

…म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर ‘या’ मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral

Video : काळ आला होता, पण.., काही मिनिटं वाचवणं रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला पडलं महागात

पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.