कन्नड भाषेवरुन सोशल मीडियावर युद्ध, शेवटी गुगलकडून दिलगिरी, नेमके कारण काय ?

गुगलच्या एका करामतीमुळे कन्नड भाषिकांच्या भावना चांगल्याच दुखावल्या आहेत. गुगल सर्चमध्ये कन्नड भाषा ही सर्वात कुरुप भाषा असल्याचं दिसत होतं. (kannada ugliest language in india)

कन्नड भाषेवरुन सोशल मीडियावर युद्ध, शेवटी गुगलकडून दिलगिरी, नेमके कारण काय ?
kannada language

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणत्या विषयावर चर्चा सुरु होईल हे सांगता येत नाही. नट-नट्यांपासून ते राजकीय व्यक्तींविषयीच्या चर्चा येथे रंगतात. सध्या मात्र एका वेगळ्याच विषयामुळे सोशल मीडियावरील वातावरण तापलेलं आहे. गुगलच्या एका करामतीमुळे कन्नड भाषिकांच्या भावना चांगल्याच दुखावल्या आहेत. गुगल सर्चमध्ये कन्नड भाषा ही सर्वात कुरुप भाषा असल्याचं दिसत होतं. याच कारणामुळे लोकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. (Google shows Kannada as ugliest language in India netizens demand apology from Google)

नेमका प्रकार काय आहे ?

आपल्याला प्रश्न पडला असेल की कन्नड भाषेमुळे सध्या सोशल मीडियावरील वातावरण का तापलेले आहे ? त्याचे उत्तर हे गुगलच्या सर्च रिझल्टची करामत हे आहे. लोकांनी गुगलवर Ugliest Language in India असं सर्च केलं तर रिझल्टमध्ये कन्नड भाषा ही सर्वात कुरुप असल्याचं दाखवलं जात होतं. नंतर हे प्रकरण एवढं वाढलं की कन्नड भाषिकांसाठी हा भावनिक मुद्दा बनला. परिणामी ट्विटर तसेच अन्य माध्यमांवर लोक व्यक्त होऊ लागले. कन्नड ही भाषा सर्वात सुंदर असून गुगलने त्याबाबत माफी मागावी अशी मागणी नेटकरी करु लागले.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

गुगलने सर्च रिझल्टमध्ये कन्नडला सर्वात कुरुप भाषा म्हटल्यामुळे लोक चांगलेच संतापले. एका नेटकऱ्याने कन्नड भाषा ही दक्षिण भारतातील सर्वात जुनी भाषा असून ती कुरुप नाही. ही भाषा सर्वात सुंदर आहे. गुगलने सर्च रिझल्ट डिलीट करावेत अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने भाषा मुळात कुरुप नसतेच. प्रत्येक भाषा ही सुंदर असते, अशी समर्पक प्रतिक्रिया दिली.

शेवटी गुगलकडून दिलगिरी 

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर कर्नाटकमधील मंत्री तसेच मोठे सेलिब्रिटीसुद्धा या विषयावर व्यक्त होऊ लागले. या कारणामुळे सोशल मीडियावरील वातावरण आणखीनच तापले. परिणामी गुगलला या प्रकाराची दखल घ्यावी लागली. गुगलने चुकीच्या सर्च रिझल्टमुळे दिलगिरी व्य्कत केली असून अल्गोरिथम दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे कर्नाटकने कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा घेतलाय.

 

इतर बातम्या :

VIDEO : मास्कच्या नावाने स्टेशनरी वस्तूंची विक्री, प्रशासनाची कारवाई, हवालदिल हातगाडीचालक थेट गाडीखाली झोपला

Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | डोक्यावर ओढणी घेऊन पोळ्या लाटणारी तरुणी, सौंदर्याचे नेटकरी दिवाने, व्हिडीओ एकदा पाहाच

(Google shows Kannada as ugliest language in India netizens demand apology from Google)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI