
शिक्षकांचे काम फक्त मुलांना शिकवणे नाही तर त्यांना योग्य मार्ग दाखवणे आहे जेणेकरून ते भविष्यात काहीतरी चांगले करू शकतील. साधारणपणे प्रत्येक शाळेत शिक्षक मुलांना अभ्यासासोबतच मजा करता यावी यासाठी अनेक ट्रिक्स वापरत असतात. तर असे काही शिक्षक आहेत जे मुलांना शिकवण्याबरोबरच एका अनोख्या पद्धतीने मजा मस्ती करायला लावतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे पाहून लोकं त्या सरकारी शिक्षिकेचं कौतूक करत आहेत. खरंतर सरकारी शाळेतील एका महिला शिक्षिकेने मुलांना तिची अशी एक अनोखं टॅलेंट दाखवलं आहे जे मुलांना खूप आवडलं आहे आणि त्यांना अभ्यास करण्यासोबतच खूप मजा येत असल्याच व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
व्हिडिओची सुरुवात एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेने बरेच फुगवलेले फुगे एकत्र करून त्याला मानवी आकार दिला आहे. त्यानंतर फुग्यावर डोळे काढत हळूहळू त्या शिक्षिकेने त्यावर नाक आणि तोंड असे चित्र काढले आहे. त्यानंतर तिने शाळेतील मुलांना मोकळ्या जमिनीवर बसवले आणि तयार मानवी आकाराच्या फुग्याला जमीनवर चिटकवले आहे. त्यांनतर विद्यार्थांना चारही बाजूनी हवा देण्यास सांगितली. त्यानंतरचे दृश्य केवळ आश्चर्यकारक नव्हते तर त्यांच्यासाठी खेळण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग देखील होता. मुले जितके जास्त फुग्यांमध्ये हवा देत होते तितकेच ते जास्त हलत होते, जणू काही फुग्यांपासून तयार मानसाचा पुतळा नाचत आहेत असे वाटात आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यांनतर असे समजते की प्रत्येक शिक्षिकेने व शिक्षकांनी या खेळकर पद्धतीने शिकवले तर शाळेत जाण्याची प्रत्येक विद्यार्थांची इच्छा नक्की होईल.
या व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर geetmeena_kholwad नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 35 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 10 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर, एकाने कमेंट केली आहे की “हे खूप छान आहे. सर्वांना शिक्षिकेचं हे टॅलेंट आवडलं आहे. सर्व शिक्षकांनी ते करायला हवे.” दुसऱ्याने विनोदाने म्हटले, “खूप मेहनतीनंतर, आणखी एक शोध लागला आहे.” तिसरी कमेंट अशी आहे की, “ही भारताची लपलेलं टॅलेंट आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “मॅडम, ही ॲक्टिव्हिटी ना तुमच्या काळात उपलब्ध नव्हती, ना आमच्या काळात. तुम्ही हे टॅलेंट कशा शिकलात? आम्हालाही शिकवा, मुलांना शिकवायला.” असे अनेक कमेंटचा वर्षाव या व्हिडिओवर अनेक स्थरातून केला जात आहे.
प्रत्येक सरकारी शाळेत असे शिक्षक असणे खूप गरजेचे आहे. कारण मुलांना अभ्यास करण्यासोबतच मज्जा मस्ती ही करता यावी आणि मुलांना लहानपणापासून शाळेची ओढ निर्माण होईल.