VIDEO : लग्नात कोरोनाची भीती, नवरदेव-नवरीने थेट काठीने वरमाला घातल्या

लॉकडाऊन काळातील एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे (Groom and bride use stick for to put varmala).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:39 PM, 3 May 2021
VIDEO : लग्नात कोरोनाची भीती, नवरदेव-नवरीने थेट काठीने वरमाला घातल्या
कोरोना होऊ नये म्हणून अनोखं जुगाड, काठीने वरमाला गळ्यात

मुंबई : लॉकडाऊन काळातील एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या लग्नात नवरदेव-नवरीने काठीच्या साहाय्याने एकमेकांना वरमाला घातल्या. त्यामुळे या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही तर कोरोना संसर्गाचा धोका आहे. याच गोष्टीला गांभीर्याने घेऊन नवरदेव-नवरीने काठीने एकमेकांना वरमाला घातल्या. या संबंधिच्या व्हिडीओवर अनेकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत (Groom and bride use stick for to put varmala).

व्हिडीओत नेमकं काय?

या संबंधिचा व्हिडीओ आयपीएस दिपांशी काब्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. “कोरोना काळात लग्नासाठी इव्हेंट मॅनेजर्सला काय काय जुगाड शोधावे लागत आहेत”, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत बॅकग्राउंडला मंगलाष्टिका सुरु आहेत. सुरुवातीला नवरी काठीच्या साहाय्याने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकते. त्यानंतर नवरदेव काठीच्या साहाय्याने नवरीच्या गळ्याच वरमाला टाकण्याचा प्रयत्न करतो.

यावेळी काठीतून एकदा वरमाला सरकरते. त्यावेळी एक व्यक्ती नवरदेवाच्या जवळ येऊन आपल्या हाताने काठीला वरमाला अडकवतो. त्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात काठीच्या साहाय्याने वरमाला टाकतो. यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि जल्लोष साजरा केला जातो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही तितकाच होतोय (Groom and bride use stick for to put varmala).

व्हिडीओ बघा :

लॉकडाऊन काळात साध्या पद्धतीत लग्न

कोरोना संकटात आणि लॉकडाऊन काळात अतिशय साध्या पद्धतीने लग्न लागत आहेत. या लग्नांमध्ये कोरोना संबंधित सर्व नियमांचं काटोकोर पालन करण्याच्या सूचाना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या लग्न समारंभामध्ये प्रशासनाच्या सर्व सूचनाचं काटोकोरपणे पालन केलं जात असल्याचं समोर येत आहे. लग्नात सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावर मास्क असतं, तसेच सॅनेटाझरचा वापर केला जातोय. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातंय.

लग्नात फक्त 25 जणांचा परवानगी

राज्यासह देशभरात कोरोनाने शिरकाव करुन आता एक वर्षापेक्षाही जास्त काळ उलटला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. दरम्यान, या काळात एखादं लग्न ठरलं असेल तर ते करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या लग्नात फक्त 25 जणांना सहभागी होता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : VIDEO : तुम्ही असं लग्न कधी बघितलंच नसेल, नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नवरा-नवरीसह नातेवाईकही पीपीई किटमध्ये