लग्न पार पडत असताना ऑफिसचं काम! “वर्क फ्रॉम मंडप” चा फोटो व्हायरल

फोटोमध्ये एक मुलगा बसलाय, त्याच्या लग्नाचे विधी सुरू आहेत, असं दिसतंय.

लग्न पार पडत असताना ऑफिसचं काम! वर्क फ्रॉम मंडप चा फोटो व्हायरल
work from marriage
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2022 | 3:34 PM

सोशल मीडियावर असे दिसून येते की, अनेक वेळा लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात वधू किंवा वर असे काही करतात जे व्हायरल होते. पण कोरोनाने खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या आयुष्यात ट्विस्ट आणलाय. वर्क फ्रॉम होम जेव्हापासून आलंय तेव्हापासून कोण कुठे बसून कधी काम करेल याचा काहीच नेम नाही. आता हा व्हायरल फोटोच बघा. हा नवरदेव लग्नाच्या दिवशी वर्क फ्रॉम होम करतोय. हा फोटो बघून लोक प्रचंड हसलेत.

खरंतर सोशल मीडियावर असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यात एक नवरदेव त्याच्या लग्नाच्या दिवशी लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. फोटोमध्ये एक मुलगा बसलाय, त्याच्या लग्नाचे विधी सुरू आहेत, असं दिसतंय. दरम्यान, लॅपटॉप उघडा ठेवून तो बसला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्रीमोयी नावाच्या युझरने लिहिले की, हा तिचा भाऊ आहे आणि हे त्याचे लग्न आहे. पण लग्नाच्या वेळी सुद्धा तिचा भाऊ विधी चालू असताना सुद्धा लॅपटॉपवर काम करत असतो. हा फोटो शेअर होताच तो व्हायरल होतो.

हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, भाऊ, आपण कोणत्या जगात राहत आहोत की लग्नाच्या दिवशीही सुट्टी नसते.

त्याचबरोबर एका युझरने असेही म्हटले आहे की, तो थोडाफार काम करत असेल. सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.