Viral Video : लग्नापूर्वी वराने जाहीरपणे मागितले असे काही, वधू लाजली आणि…

Viral Video : लग्नापूर्वी वराने जाहीरपणे मागितले असे काही, वधू लाजली आणि...
वधू-वर

एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये वराने आपल्या वधूला असे काही मागितले, की ती लाजली. होय, वधूने विचारही केला नसेल की तिला अशा घटनेचा सामना करावा लागेल.

प्रदीप गरड

|

Jan 19, 2022 | 11:56 AM

लग्नादरम्यान वधू-वरांना त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. लग्नात कोणते कपडे घालायचे आणि आनंद उत्सहा कायम ठेवायचा, हे सर्व पूर्वनियोजित असते. मात्र, कधी कधी अचानक असा क्षण येतो, ज्याचे नियोजन करता येत नाही. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये वराने आपल्या वधूला असे काही मागितले, की ती लाजली. होय, वधूने विचारही केला नसेल की तिला अशा घटनेचा सामना करावा लागेल.

वर खुश

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असून वरमाला सोहळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान, वधूने वराच्या गळ्यात माळ घातली आहे आणि आता ती वराच्या हार घालण्याची वाट पाहत आहे. स्टेजवर उभा असलेला वर खुश दिसत होता, कारण तो हसला आणि वधूकडे काहीतरी मागितले, ज्यामुळे तिला आश्चर्य वाटले.

रोमँटिक होऊन घेतले वराचे चुंबन

वराने हातवारे करून सांगितले, की आधी मला माझ्या गालावर चुंबन घ्यावे लागेल, तरच मी ही माळ तुझ्या गळ्यात घालेन. हे ऐकून वधू लाजली. मग तिने सर्वांसमोर अतिशय रोमँटिक होऊन वराचे चुंबन घेतले. चुंबन घेतल्यानंतर लगेचच वराने वधूच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि दोघांनी विधी पूर्ण केला.

इन्स्टाग्रामवर अपलोड

वधू-वरांच्या या स्टाइलला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. मात्र, वराने मंचावर सर्वांसमोर चुंबनाची मागणी केल्याचे क्वचितच पाहायला मिळते. Weddings Unfolded नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. या व्हिडिओला एक लाख 66 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर तो सुमारे 10 लाख वेळा पाहिला गेला आहे. इतर अनेक यूझर्सनी देखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली.

Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!

Viral Video : निवांत बसले होते गप्पा मारत आणि अचानक कोसळला पंखा

Video : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें