Viral Video : निवांत बसले होते गप्पा मारत आणि अचानक कोसळला पंखा

Viral Video : निवांत बसले होते गप्पा मारत आणि अचानक कोसळला पंखा
पंखा पडला खाली

तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुम्ही पंख्याखाली बसून हवा घेत आहात आणि तोच पंखा (Fan) खाली पडेल? आता अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

प्रदीप गरड

|

Jan 19, 2022 | 10:10 AM

कोणासोबत कधी काय होईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर पाहायला मिळतात, जे पाहून धक्का बसतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुम्ही पंख्याखाली बसून हवा घेत आहात आणि तोच पंखा (Fan) खाली पडेल? आता अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मात्र, तिथे असलेले लोक थोडक्यात बचावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक त्यांच्या कमेंट्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

भरली धडकी

प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की काही लोक खोलीत पंख्याची हवा घेत बसले होते, मात्र तेवढ्यात पंखा पाली पडतो. मात्र, तेथे उपस्थित लोक जखमी झाले नसून त्यांना धडकीच भरली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून यूझर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांचे म्हणणे आहे, की त्यांच्या लहानपणी अनेकदा असाच विचार व्हायचा, मात्र त्यांच्यासोबत अशी घटना कधी घडली नाही.

तुटून पडला

काही लोक खोलीत कसे आराम करत होते, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही सेकंदातच त्याचा मोठा अपघात होणार होता. दोन पुरुष खाली झोपले होते, तर एक व्यक्ती टेबलाजवळ बसली होती. सर्वजण आपापसात बोलत होते आणि पंख्याच्या हवेचा आनंद घेत होते, पण तेवढ्यात पंखा तुटून जमिनीवर पडला. खोलीच्या मधोमध पडलेल्या पंख्याखाली सुदैवाने कोणीही नव्हते, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना पाहून तेथे उपस्थित असलेले लोक खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी स्वतःला खूप भाग्यवान मानले. पंखा बराच जुना दिसत होता.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. घंटा नावाच्या अकाऊंटवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की हा व्हिडिओ पाहताच मी माझ्या खोलीत चालू असलेल्या पंख्याकडे पाहिले. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की आता मी माझ्या खोलीतून पंखा काढून टाकेन आणि कूलर चालू करेन.

Video : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…

अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळली होती ‘ही’ वस्तू! आता किंमतीचा अंदाजही लावू शकणार नाहीत

Video : पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेला बुर्ज खलिफापेक्षा मोठा लघुग्रह, नासानं शेअर केला GIF व्हिडिओ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें