Video : पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेला बुर्ज खलिफापेक्षा मोठा लघुग्रह, नासानं शेअर केला GIF व्हिडिओ

Video : पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेला बुर्ज खलिफापेक्षा मोठा लघुग्रह, नासानं शेअर केला GIF व्हिडिओ
प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा(NASA)ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर GIF स्वरूपात एक व्हिडिओ (Video) जारी केला आहे. हा व्हिडिओ 12 जानेवारीचा आहे. हा महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल, असा इशारा नासाने दिला होता.

प्रदीप गरड

|

Jan 19, 2022 | 8:42 AM

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा(NASA)ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर GIF स्वरूपात एक व्हिडिओ (Video) जारी केला आहे. हा व्हिडिओ 12 जानेवारीचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. हा महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल, असा इशारा नासाने दिला होता. जो भारतीय वेळेनुसार 19 जानेवारीला पहाटे 2:45च्या सुमारास म्हणजेच आज रात्री पृथ्वीजवळून गेला.

बुर्ज खलिफापेक्षा मोठा

नासाच्या फार नियर अर्थ स्टडीज सेंटरने ही माहिती दिली. त्यानुसार 7482 (1994 PC1) नावाचा हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने खूप वेगाने आला. या लघुग्रहाचा आकार 3,450 फूट इतका होता. म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफापेक्षा तो 700 फूट मोठा होता.

45,000 मैल वेगाने आला

नासाच्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह ताशी 45,000 मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने आला. तथापि, हा लघुग्रह पृथ्वीपासून 1.93 दशलक्ष किमी अंतरावरून गेला, जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या पाचपट जास्त आहे. मात्र तरीही त्यापासून दूर राहा, असे सांगण्यात आले. त्याचा मागोवा घेण्यासाठी नासाने तयार केलेल्या यंत्रणेच्या मदतीने ते थेट पाहण्यात आले. व्हिडिओ पाहा –

याआधीही आदळलेत लघुग्रह

या महिन्यात पृथ्वीजवळून 5 लघुग्रह जाण्याची शक्यता नासाने वर्तवली आहे. जेव्हा एखादा छोटा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा तो आपोआप जळून राख होतो. तथापि, अनेक वेळा मोठे लघुग्रह ग्रहांशी आदळतात. याआधीही काही लघुग्रह पृथ्वीवर आदळले आहेत. 2019मध्ये एक लघुग्रह पृथ्वीच्या 43 हजार मैल अंतरावरून म्हणजेच अगदी जवळून गेला होता. त्याची माहिती शास्त्रज्ञांना 24 तासांपूर्वीच होती.

Viral : क्वचितच पाहिला असेल असा आळशी कुत्रा! 30 लाखांहून अधिक व्ह्यूजचा ‘हा’ Video पाहा

Video | मसाला डोसा आईस्क्रिम रोल! ऐकायला इतकं विचित्र आहे, चवीला कसं असेल?

Video | भूकंप आला तर जीव वाचवाल की दारुच्या बाटल्या? हा दादुस दारुसाठी जीवही द्यायला तयार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें