Gujarat Election Results 2022: आज तर नेटकरी खूप व्यस्त! मिम्सचा नुसता पाऊस

निवडणुकीच्या निकालाची चर्चा सोशल मीडियावरही तीव्र झाली आहे.

Gujarat Election Results 2022: आज तर नेटकरी खूप व्यस्त! मिम्सचा नुसता पाऊस
Gujarat election results 2022
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 08, 2022 | 6:02 PM

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांची अवस्था अत्यंत वाईट झाली. भाजपने मात्र धुमाकूळ घातला. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. सलग अनेक वर्षे ती येथे जिंकत आहे. अशा परिस्थितीत भाजपला इथे आव्हान देणं म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखं आहे. निवडणुकीच्या निकालाची चर्चा सोशल मीडियावरही तीव्र झाली आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि मजेदार मिम्सही शेअर करत आहेत. अनेक युजर्सनी मजेशीर मिम्स असलेल्या छोट्या क्लिप्सही शेअर केल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर तुम्ही खूप खूप हसाल.