खाकीला कडक सॅल्यूट!, वृद्ध महिलेला पाठीवर घेऊन वाळवंटात 5 किमी प्रवास, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Apr 23, 2022 | 12:05 PM

गुजरातमधील कच्छ भागातल्या एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी एक वृद्ध महिला गेली होती. यावेळी ऊन एवढं जास्त होतं की त्यामुळे ही महिला बेशुद्ध झाली.गुजरातच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

खाकीला कडक सॅल्यूट!, वृद्ध महिलेला पाठीवर घेऊन वाळवंटात 5 किमी प्रवास, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
व्हायरल न्यूज
Follow us on

मुंबई : अनेकदा पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. पण काही घटना या सगळ्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) होत आहे. यात एका महिला पोलीसाने बजावलेल्या कामगिरीचं कौतुक होतंय. गुजरातच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने (Gujarat Ladies Police) माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. असल्या तळपत्या उन्हात वाळवंटात या पोलीस अधिकाऱ्याने एका वृद्ध महिलेला खांद्यावर घेऊन प्रवास केलाय. थोडा थोडका नव्हे तर 5 किलोमीटर… या पोलिस अधिकाऱ्याचं विशेष कौतुक होतंय.

नेमकं काय घडलं?

गुजरातमधील कच्छ भागातल्या एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी एक वृद्ध महिला गेली होती. यावेळी ऊन एवढं जास्त होतं की त्यामुळे ही महिला बेशुद्ध झाली.गुजरातच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. असल्या तळपत्या उन्हात वाळवंटात या पोलीस अधिकाऱ्याने एका वृद्ध महिलेला खांद्यावर घेऊन प्रवास केलाय. थोडा थोडका नव्हे तर 5 किलोमीटर… या पोलिस अधिकाऱ्याचं विशेष कौतुक होतंय. या वृद्ध महिलेला सुखरूप घरी पोहोचवलं. या महिली पोलीस अधिकाऱ्याचं सध्या खूप कौतुक होतंय. वर्षाबेन परमार असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे.

या महिला पोलीस अधिकाऱ्याचं गुजरातच्या गृहमंत्रालयाकडूनही कौतुक करण्यात आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी महिला पोलिसाचे कौतुक करताना ‘खाकीतली माणुसकी’ असं म्हटलंय.” महिला पोलीस अधिकारी वर्षाबेन परमार यांनी कच्छमधील रापर येथे मोरारीबापूजींची कथा ऐकण्यासाठी गेलेल्या 86 वर्षीय वृद्धाला महिलेला मदत केली. या वृद्ध महिलेला 5 किमी खांद्यावर उचलून घेऊन गेल्या. ही माणुसकी जिवंत असल्याचं उत्तम उदाहरण आहे. या महिला पोलीस कॉन्स्टेबलला वृद्ध महिलेने मनापासून आशीर्वाद दिले असतील. वर्षाबेन परमार यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. परमार तुमचं विशेष कौतुक”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

नेटकऱ्यांनीही परमार यांच्या या कामगिरीचं नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक होतंय. तुमच्या माध्यामातून माणुसकीचं दर्शन होतंय. असं नेटकरी म्हणत आहेत. अनेकांनी त्यांच्या कामाला सलाम केला आहे.

संबंधित बातम्या

Video : लग्नाच्या सेलिब्रेशनला लाखोंचा खर्च, नातेवाईकाच्या अतिउत्साहामुळे हजारो रूपयांचा केक मातीमोल

फोटोत दिसणाऱ्या कॉफीच्या मागे दडलंय एक रहस्य, जाणून घ्या नेमकं काय आहे?

ऐकावं ते नवलच! कावळ्याने ओढली चक्क सिगारेट, कावळा आणि युवकाच्या खास दोस्तीची गोष्ट…