या देशात हेअर कटींग सर्वात महागडे, होईल तुमचे पाकिट रिकामे, भारताचा कितवा क्रमांक

केस कापण्यासाठी वेगवेगळ्या देशात भिन्न दर आहेत, परंतू तुम्हाला वाटत असेल अमेरिकेत हेअर कटींगचे दर जास्त आहेत, तर त्याहूनही या देशात सर्वाधिक दर आहेत.

या देशात हेअर कटींग सर्वात महागडे, होईल तुमचे पाकिट रिकामे, भारताचा कितवा क्रमांक
hair cutting rate
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 07, 2023 | 12:34 PM

नवी दिल्ली : हेअर कटींग सलूनच्या क्षेत्रात आता मोठमोठे ब्रॅंड आल्याने केस कापण्याचे दर हल्ली थोडे महागच असतात. या वातानुकूलित सलूनमध्ये केस कापण्याच दर सर्वसामान्य हेअर कटींग सलून ( Hair Cutting Salon ) पेक्षा जास्तच असतात. परंतू जगात काही देश असे आहेत. तेथे पुरुषांचे केस कापण्यासाठी दर इतके जादा आहेत की तुमचे पाकिट क्षणाधार्त खाली होईल. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्सने ( World of Statistics ) एक अहवाल जारी केला आहे. त्यात प्रत्येक देशातील पुरुषांचे हेअर कटींग दरसूची जाहीर करण्यात आली आहे. तर त्यातुलनेत भारतात सरासरी केस कापण्याचा दर किती आहे ? चला पाहुया…

नॉर्वे येथे पुरुषांचे हेअर कटींगचे दर 64.60 डॉलर म्हणजे सुमारे 5,325 रुपये इतके जास्त आहेत. वर्ल्ड ऑफ  स्टॅटिस्टीक्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार नॉर्वे हा देश केस कापण्यासाठी सर्वात महागडा आहे. त्यानंतर केस कापणे जपानचा लागतो. जपानमध्ये मुलांचे केस कापण्याचे दर सर्वसाधारण 56 डॉलर म्हणजे सुमारे 4,616 इतका आहे. तर डेन्मार्कचा क्रमांक या यादीत तिसरा आहे. येथे हेअर कटींगचे दर 48.21 डॉलर म्हणजे सुमारे 3973 रुपये इतकी आहे. स्वीडन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्वीडन येथे केस कापण्यासाठी 46.13 डॉलर म्हणजे 3,967 इतके आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे नाव आहे. ऑस्ट्रेलियात केस कापण्यासाठी 46 डॉलर म्हणजे सुमारे 3,792 रुपये द्यावे लागतात.

अमेरिकेत किती रुपयांत केस कापतात

अमेरिका याबाबतीत सातव्या क्रमांकावर असून येथे हेअर कटींगचा चार्ज 44 डॉलर म्हणजे 3,626 रुपये आहे. आठव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड असून येथे 42.96 डॉलर म्हणजे सुमारे 3,542 रुपयांमध्ये केस कापून मिळतात. तर नवव्या क्रमांकावर फ्रान्स असून येथे हेअर कटींगचे 37.05 डॉलर म्हणजे 3,054 रुपये इतके घेतात. साऊथ कोरिया या यादीत 10 व्या क्रमांकावर असून येथे केस कापण्याचे 36.94 डॉलर म्हणजे 3,045 रुपये आकारण्यात येतात.

पाकिस्तानात किती रुपये घेतात

भारताचा विचार केला तर हेअर कटींगसाठी देशात 5.29 डॉलर म्हणजे सुमारे 436 रुपये आकारले जातात. भारताचा या यादीत 35 वा आहे. तर पाकिस्तानात केस कापण्यास 4.44 डॉलर म्हणजे सुमारे 365 रुपये खर्चावे लागतात.