पाकिस्तानच्या या टिकटॉक स्टारचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा काय म्हणाली…
हरीम शाहची ज्यावेळी मुलाखत सुरु होती. त्यावेळी तिला त्या व्हिडीओबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी हरीम शाह हीने तिच्या जवळच्या मित्रांनी मोबाईलमधून व्हिडीओ चोरुन घेतल्याचं जाहीर केलं

नवी दिल्ली : पाकिस्तानची टिकटॉक स्टार हरीम शाहचा (pakistan tiktok star harim shah) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media)चांगलाचं व्हायरल झाला आहे. हरीम शहा म्हणते की, तिच्या जवळच्या मित्रांनी तो व्हायरल केला आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा होती. परंतु पाकिस्तानमधील (pakistan) एका खासगी टिव्ही वाहिनीला मुलाखत देत असताना हरीम शाह हीने तिच्या मित्रांवर व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.
हरीम शाहची ज्यावेळी मुलाखत सुरु होती. त्यावेळी तिला त्या व्हिडीओबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी हरीम शाह हीने तिच्या जवळच्या मित्रांनी मोबाईलमधून व्हिडीओ चोरुन घेतल्याचं जाहीर केलं. संदल खट्टक आणि आयशा नाज अशी त्यांची नावं आहेत.
पाकिस्तानमधील एक वेबसाईटने म्हटलं आहे की, हरीम शाहने सांगितलं आहे की, हा व्हिडीओ मी एकवर्षापुर्वी तयार केला आहे. त्यापैकी एक कराची येथील घरातील आहे, तर दुसरा इस्लामाबाद येथे शुट करण्यात आला आहे. खट्टक आणि नाज त्यावेळी हरीम शाह हीच्या सोबत राहत होते. त्यावेळी त्यांनी माझा मोबाईल चोरला आणि व्हिडीओ सेव्ह करुन घेतला होता. त्या दोघांच्या विरोधात मी कारवाई करणार असल्याचे हरीम शाह यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
हरीम शाह कोण आहे ?
हरीम शाह पाकिस्तान देशातील एक टिकटॉक स्टार आहे. तिच खरं नाव फिजा हुसैन आहे. हरीम शाहचा सोशल मीडियावर मोठा फॅनवर्ग आहे. इंन्स्टाग्रामवरती तीन लाखच्या वरती तिचे फॅन आहेत. टिकटॉकवरती दोन लाखांच्या आसपास फॅन आहेत. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले आहेत. तिचं शिक्षण पाकिस्तानमधील एका धार्मिक शाळेत झालं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तिची जास्त चर्चा सुरु झाली आहे.
