नूडल्स कसे बनवतात बघा आणि पुन्हा नूडल्स खाऊन दाखवा!
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही शेवटचं रस्त्याच्या कडेला शेजवान सॉससह चायनीज हाका नूडल्स कधी खाल्ले होते?"

मुंबई: हल्ली तरुण पिढीला चायनीज फूडचे वेड आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर बहुतांश तरुण चायनीज फूडचा आस्वाद घेताना दिसतील. पण हे नूडल्स कसे बनवले जातात हे तुम्हाला माहित आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नूडल्स खाणं बंद करू शकता. हा व्हिडिओ पीएफसी क्लबचे संस्थापक चिराग बडजात्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुठल्या अवस्थेत एकदम घाणेरड्या पद्धतीने नूडल्स बनवले जातात हे दिसत आहे. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडिओ एका छोट्या नूडल्स फॅक्टरीमध्ये शूट करण्यात आल्याचं दिसतंय. यात मजूर नूडल्स तयार करताना दिसत आहेत. हे लोक पीठ मळण्यासाठी मिक्सरमध्ये ठेवतात. यानंतर ते नूडल्स यंत्राद्वारे पातळ धाग्यात कापले जाते. यात कुणीही ना स्वच्छतेची काळजी घेतो, ना हातात हातमोजे घालतो.
उकळल्यानंतर नूडल्स जमिनीवर फेकले जातात. ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक होईपर्यंत असेच राहतात. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही शेवटचं रस्त्याच्या कडेला शेजवान सॉससह चायनीज हाका नूडल्स कधी खाल्ले होते?”
When was the last time you had road side chinese hakka noodles with schezwan sauce? pic.twitter.com/wGYFfXO3L7
— Chirag Barjatya (@chiragbarjatyaa) January 18, 2023
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट्सचा पूर आला. लोकांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला.एका युजरने लिहिले की, ‘जर तुम्ही एखादे प्रॉडक्ट घेतले आणि ते मोठ्या ब्रँडचे नसेल तर ते बनवण्याची पद्धत अशी असेल.’
