world’s funniest joke | जगात भारी ! सर्वात लोकप्रिय जोक तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या या संबंधी माहिती

| Updated on: Dec 07, 2021 | 10:52 AM

मानसशास्त्रात असं म्हटलं जात की आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हास्यामध्ये दडले आहे. हसणं माणसाला त्याच्या प्रत्येक दु:ख विसण्यास भाग पाडतं. हास्यामुळे आपली चिंता आणि तणाव दूर होतो.

worlds funniest joke | जगात भारी ! सर्वात लोकप्रिय जोक तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या या संबंधी माहिती
joke
Follow us on

मुंबई : मानसशास्त्रात असं म्हटलं जात की आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हास्यामध्ये दडले आहे. हसणं माणसाला त्याच्या प्रत्येक दु:ख विसरण्यास भाग पाडतं. हास्यामुळे आपली चिंता आणि तणाव दूर होतो. आयुष्यात हसण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हसण्यामुळे मानसिक ताण तर कमी होतोच पण, संकटांना सामोरे जाण्याची तयारी देखील होते.

नुकताच एक अहवाल जगासमोर आला आहे. यामध्ये जगातील सर्वात विनोदी जोक कोणता? याचा अभ्यास केला आहे. LAD बायबल (LAD BIBLE) या वेबसाईटच्या अभ्यासावरुन एक मानसशास्त्रज्ञ डॉ रिचर्ड वाईजमन यांनी 2001 मध्ये लाफ लॅब नावाने एक वेबसाईट सुरु केली होती. यामध्ये त्यांनी जवळपास 15 लाख लोकांचे एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये वेगवेगळ्या देशांतील लोकांचा समावेश होता. या लोकांना त्यांनी जगातील सर्वोत्तम 5 जोक ऐकवले होते. त्यापैकी 1 जोक हा सर्वांनाच खूप आवडला. चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो जोक.

हा आहे जोक

दोन शिकारी जंगलात असतात जेव्हा त्यापैकी एक कोसळतो. तो श्वास घेत असल्याचे दिसत नाही. हे पाहताच दुसरा माणूस त्याचा फोन काढतो आणि आपत्कालीन सेवांना कॉल करतो. आणि म्हणतो “माझा मित्र मेला! मी काय करू?” दुसरी कडे त्याचे श्वास सुरूच असतात.

ऑपरेटर म्हणतो: “शांत व्हा, मी मदत करू शकतो. प्रथम, तो मेला आहे याची खात्री करूया.”

थोड्या वेळासाठी एक भयाण शांतता असते , नंतर एक बंदुकीचा शॉट ऐकू येतो. फोनवर परत, माणूस म्हणतो: “ठीक आहे, आता पुढे काय?”

शास्त्रज्ञांचे मत
शास्त्रज्ञांच्या मते या विनोदामध्ये माणसाची प्रवृत्ती सांगण्यात आली आहे त्यामुळेच हा जोक सर्वाना खूप आवडला. हा विनोद आपण आपल्या लहानपणापासून जगाच्या कानाकोपऱ्यातून नक्कीच ऐकला असेल पण हिच या विनोदाची खासियत आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा