AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल 1 सेकंदाचे महत्त्व, मृत्यूच्या दारातून परत आला बाईकस्वार

Viral Video : हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत येणे काय असते याचा अंदाज येईल. एक क्षण तर काळजाचा ठोका चुकला. रस्त्यावरील लोक जणू थिजले. पण दैव बलवत्तर म्हणतात त्याची प्रचिती हा व्हिडिओ पाहून नक्की मिळते.

हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल 1 सेकंदाचे महत्त्व, मृत्यूच्या दारातून परत आला बाईकस्वार
दैव बलवत्तर म्हणून वाचलाImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 08, 2025 | 9:32 AM
Share

Trending Video : समाज माध्यमावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे की तो पाहून कुणाच्या पण काळजाचा थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार अत्यंत वेगाने रस्त्यावरील वाहनांमधून वाट काढताना दिसतो. चिंचोळ्या पट्टीतून तो दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बाईकचा अतिवेगामुळे अनेकाचा जीव खालीवर होतो. हा बाईकस्वार एका कारच्या अगदी जवळून जातो. कारला टक्कर देणार इतक्यात तो वाचतो. त्यावेळी अनेकांच्या काळजात धस्स होते. त्यांच्या काळजाचा थरकाप उडतो. एक सेंकद तर मोठा अपघात होतो की काय असे वाटते. पण हा दुचाकीस्वार वाचतो आणि वाहनांच्या मधून बाईक दामटतो.

मृत्यूच्या दारातून परत आला दुचाकीस्वार

हा बाईकस्वार इतक्या वेगात असताना पण व्हिडिओ शूट करताना दिसतो. तो व्हिडिओ शूट करताना हे विसरतो की तो हायवेवर बाईक चालवत आहे. या व्हिडिओत हे स्पषपणे दिसते की, तो मुद्दामहून खतरनाक स्टंट करत आहे. तो त्याचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर झाल्यावर लोकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. असे स्टंट करणारा त्याचाच नाही तर इतरांचा पण जीव धोक्यात घालत असल्याचे युझर्स म्हणत आहेत.

कार चालकाने कार थांबवून केली विचारपूस

या खतरनाक स्टंटमधून हा बाईकस्वार वाचला. अपघात होता होता तो बचावला. ज्या कासोबत अपघात होणार होता. तो कार चालकही पुढे जाऊन कार थांबवतो आणि बाईकस्वाराची विचारपूस करतो. त्यावेळी दुचाकीस्वार त्याला आपण ठीक असल्याचे सांगतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युझर्स संताप व्यक्त करत आहे. बाईकस्वाराने आपला आणि इतर वाहन चालकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप त्याच्यावर करत आहेत.

दैव बलवत्तर नाही तर जीव गेला असता

हा व्हिडिओ @DudespostingWs नावाच्या एक्स खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओवर लाईक, कमेंट केल्या आहेत. यासारख्या लोकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो, अशी प्रतिक्रिया एका युझर्सने दिली आहे. तर त्याचे नशीब चांगले होते, नाही तर त्याचा जीव गेला असता, अशी कमेंट दुसर्‍याने लिहिली. तर ही पूर्णपणे बाईकस्वारची चूक होती अशी कमेंट पण करण्यात आली आहे.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.