Himachal Landslide : आयुष्यातील सुंदर प्रवासानं केला घात, सोलो ट्रीपवर गेलेल्या डॉक्टरचं शेवटचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jul 26, 2021 | 11:38 AM

हिमाचलमध्ये झालेल्या भूस्खलनात 9 लोकांचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाले. या मृतांपैकी एक म्हणजे डॉ दीपा शर्मा. दीपा अवघ्या 34 वर्षांची होती आणि सोशल मीडियावर ती सतत हिमाचलचे फोटो शेअर करत होती. (Himachal Landslide: The last tweet of a doctor who went on a solo trip went viral on social media)

Himachal Landslide : आयुष्यातील सुंदर प्रवासानं केला घात, सोलो ट्रीपवर गेलेल्या डॉक्टरचं शेवटचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल
Follow us on

मुंबई : हिमाचल हे (Himachal) भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. यामुळेच वर्षभर पर्यटक येथे भेट देत असतात. प्रत्येक व्यक्तीला डोंगर दऱ्या खूप आवडतात, मात्र अनेकदा या सुंदर पर्वतांचं रौद्र रुप पाहायला मिळतं. 25 जुलैला किन्नौर जिल्ह्यातही असंच दृश्य पाहायला मिळालं. येथे झालेल्या भूस्खलनात 9 लोकांचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाले. या मृतांपैकी एक म्हणजे डॉ दीपा शर्मा. दीपा अवघ्या 34 वर्षांची होती आणि सोशल मीडियावर ती सतत हिमाचलचे फोटो शेअर करत होती. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच तिनं स्वत:चा एक फोटोही ट्विट केला होता.

या फोटोसोबत तिनं लिहिलं होतं की, ‘मी सध्या भारताच्या शेवटच्या टप्प्यावर उभी आहे, त्यापलीकडे नागरिकांना जाण्याची परवानगी नाही. या ठिकाणाहून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर तिबेटची सीमा असून ती चीननं बेकायदेशीरपणं ताब्यात घेतली आहे.’ यानंतर तिने आपला जीव गमावला. व्यवसायानं डायटिशियन असलेली दिपा शर्मा पहिल्यांदाच हिमालयात एकटी फिरायला गेली होती. पण तिच्यासाठी हा तिच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला.

पाहा शेवटचं ट्विट

आता तिचं हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार शेअर केलं जात आहे. अनेक लोक हे ट्विट शेअर करत आहेत आणि म्हणत आहेत की आयुष्य खरोखर वेदनादायक आहे. एका ट्विटर वापरकर्त्यानं लिहिलं की – मी एक सुपर उत्साही, मजेदार प्रेमळ आणि सुंदर व्यक्ती म्हणून तुला नेहमीच लक्षात ठेवीन, तुझ्या आत्म्याला शांती मिळावी.. या दुर्घटनेत चार महिला ठार झाल्या आहेत. मृत्यूमुखी पडलेले बहुतेक लोक जयपूरचे होते. दीपा स्वत: जयपूरची होती.

दीपानं आपला जीव गमावला त्याच्या भूस्खलनाचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रचंड वेगानं डोंगरावरुन खाली पडताना प्रचंड दगड पाहिले जाऊ शकतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांना धडकी भरली आहे. हा व्हिडिओ सांगत आहे की पर्वत केवळ सुंदरच नाहीत तर कोणत्याही क्षणी ते लोकांना ठार करू शकतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांना इतकी भीती वाटली की त्यांनी असं म्हटलं की आता ते कधीही डोंगरावर फिरणार नाहीत.

संबंधित बातम्या

Video | बॉसने फटकारलं म्हणून तरुणी चिडली, थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक व्हिडीओ व्हायरल

Video | विंकिंग गर्ल प्रिया वारियरच्या नव्या व्हिडीओची चर्चा, साडीमधील डान्स पाहून नेटकरी घायाळ