या गावात 5 दिवस कपडेच घालत नाहीत महिला, कोणताही विचार मनात आणण्यापूर्वी जाणून घ्या कारण पण तितकेच खास
Pini Village Social Customs- Tradition : भारतात कोसावर भाषा बदलते म्हणतात. तशाच प्रथा आणि परंपरामध्ये वेगळे पण दिसते. अशीच एक हटके परंपरा या गावात पाळली जाते. या परंपरेची चर्चा सर्वदूर आहे. काय आहे त्यामागील कहाणी?

हिमाचल प्रदेश हे हिमालयाच्या कुशीतील राज्य आहे. या राज्यावर निसर्गाने भरभरून कृपा केली आहे. या हिमालयीन प्रदेशात पिणी नावाचे अत्यंत सुंदर असे गाव (Pini Village) आहे. निसर्गाने या गावावर मुक्त हस्ताने उधळण केली आहे. हे गाव त्याच्या एका हटके परंपरेमुळे सुद्धा चर्चेत आहे. या गावातील महिला श्रावण महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत. ही परंपरा आताची नाही तर अत्यंत जुनी (Social Customs India) आहे. आजही या गावातील अनेक महिला त्याचे पालन करतात. काय आहे या परंपरेमागील कारण?
का पाळण्यात येते ही परंपरा?
पिणी नावाच्या या गावात श्रावण महिन्यातील पाच दिवसात महिला कपडे घालत नाहीत. या दरम्यान महिला स्वत: हाताने तयार केलेल्या लोकरीचा वापर केलेले कपडा शरीराला गुंडाळतात. ही परंपरा गावात पवित्र मानण्यात येते. जर या परंपरेचे पालन केले नाही तर त्या कुटुंबात एखादी आपत्ती, संकट येते असे मानण्यात येते. त्यामुळे अनेक महिला या परंपरेचे पालन करतात.
परंपरेमागील कहाणी काय?
या परंपरेमागे एक मान्यता आहे. एक कथा सांगण्यात येते. त्यानुसार, जुन्या काळात या गावात एक राक्षस होता. त्याची दहशत होती. तो सुंदर आणि श्रृंगार केलेल्या महिलांना उचलून नेत होता. त्यामुळे महिला वैतागल्या. त्यांनी देवाचा धावा केला. देवांनी त्या राक्षसाला ठार केले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. श्रावण महिन्यातील पाच दिवसांपर्यंत महिला कपडे घालत नाही. कोणतीही वाईट शक्ती आकर्षित होऊ नये ही त्यामागील धारणा आहे. तर निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ही प्रथा पाळण्यात येत असल्याची दुसरी एक मान्यता आहे. या काळात महिला निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात.
पुरूषांसाठी पण नियम
आधुनिक काळात या परंपरेत थोडा बदल झाला आहे. आता महिला तरल, पतला कपडा अंगावर धारण करतात. ज्या महिला या परंपरेचे पालन करतात, त्या घरातच थांबतात. या काळात पती-पत्नी एकमेकांसमोर येत नाहीत. ते या काळात बोलत सुद्धा नाहीत. या काळात ब्रह्मचर्येचं पालन करण्यात येते.
पुरुषांसाठी पण या काळात नियम बांधून दिले आहेत. या सणासुदीत पुरूषांना काही नियमांचे पालन करावे लागते. त्यांना मास-मासे खाता येत नाही. व्यसन करता येत नाही. त्यांना ब्रह्मचर्येचं पालन करावे लागते. या पाच दिवसात बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करता येत नाही. या काळात गावात शांतता आणि पावित्र्य टिकवण्यात येते. देवाचे नामस्मरण करण्यात येते.
