‘विचार केला रोमांस करू…’ हनिमूनसाठी मनालीमध्ये पोहचले कपल, सजवला बेड, हात लावताच बसला जोरदार करंट आणि…
Honeymoon in Manali : हे जोडपे हनिमूनचे स्वप्न घेऊन मनाली येथे गेले. पण तिथ झाले उलटेच. काय घडले? Video Creator स्मिता आचार्य यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 2.7 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे.

अक्षय कुमार आणि जुही चावला यांचा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेज खिलाडी’ तुम्हाला आठवतो का? यामध्ये जुही चावला हिला एक असे ट्रान्समीटर लावलले असते की, ज्यावेळी अक्षय कुमार तिला हात लावतो. त्यावेळी अलार्म वाजतो. मनाली येथे हनिमूनसाठी गेलेल्या एका जोडप्याला असाच अनुभव आला. या जोडप्याला बेडवर पोहचताच करंट लागत होता. त्यामुळे त्यांचे रोमांसचे स्वप्न भंगले. या करंटमुळे दोघांना जवळ ही बसता आले नाही. काय झाले असे?
सर्व संपलं, टाटा, बाय-बाय
याविषयीची अडचण काय आली याची माहिती व्हिडिओ क्रिएटर स्मिता आचार्य यांनी दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमावर शेअर केला. या व्हिडिओत हॉटेलमधील रूम दिसते. त्यात एक बेड फुलांनी सजलेले दिसते. बेडवर गुलाबाच्या फुलांच्या आकाराचे दिल ही काढण्यात आले होते. पण त्यानंतर ही मुलगी स्वत: फुलांची ही चादर हटवताना. ती गोळा करताना दिसून येते. त्यावेळी ती म्हणते ‘समाप्त’. तर त्यावेळी पती सुद्धा ‘सर्व संपलं, टाटा, बाय-बाय…’ असे म्हणताना व्हिडिओत दिसतो. ‘मनाली येथे आलो होतो रोमान्ससाठी, पण येथे तर हात लावला तरी करंट बसतोय’, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
View this post on Instagram
स्मिता आचार्य यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला 2.7 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी सुद्धा त्यांना असाच अनुभव आल्याचे सांगितले. अनेकांनी त्यांचे असेच अनुभव शेअर केले आहेत. काहींनी असे मनालीमध्ये का घडते असा प्रश्न केला आहे.
Static Charge मुळे नाही करता आला रोमांस
या जोडप्याला Static Charge मुळे करंट बसत होता. अति थंडीच्या प्रदेशात असे वारंवार घडते. Static Charge म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो. या स्थिर ऊर्जेमुळे, ऊर्जा बाहेर पडत नाही. ती एकाच ठिकाणी साचते. त्यामुळे ज्यावेळी दोन वस्तू एकमेकांना घर्षण करतात, त्यावेळी इलेक्ट्रिक करंट लागल्याचा भास होतो आणि तो वारंवार होतो. त्याला ट्रायबोइलेक्ट्रिक इफ़ेक्ट (Triboelectric Effect) असे म्हणतात.
थंडीच्या ठिकाणी बसतो ‘करंट’
थंड आणि शुष्क प्रदेशात आर्द्रता कमी होते. त्यामुळे स्टॅटिक चार्ज वस्तू, शरीरावर तयार होतो. ज्यावेळी अशा प्रदेशात सिंथेटिक कपडे घालतो आणि वापरतो त्यावेळी तिथे इलेक्ट्रिकल प्रवाह तयार होतो. ज्यावेळी आपण वस्तू अथवा व्यक्तीला हात लावतो, त्यावेळी हलका झटका बसतो. करंट लागल्यासारखे होते. हा प्रकार सतत होऊ शकतो.
