AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT बाबाला मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवा, टीम इंडियाने अभय सिंहची पूर्ण नशा उतरवली, भविष्यवाणी पुन्हा खोटी ठरली

IIT Baba Prediction False Again : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने कांगारूना धूळ चारली. ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर आयआयटी बाबाची नेटिझन्सने अशी काही धुलाई केली की विचारता सोय नाही.

IIT बाबाला मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवा, टीम इंडियाने अभय सिंहची पूर्ण नशा उतरवली, भविष्यवाणी पुन्हा खोटी ठरली
आयआयटी बाबा जमके ट्रोलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 04, 2025 | 10:25 PM
Share

ICC Champions Trophy 2025 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने कांगारूवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने आता अंतिम सामन्यात धडक दिली आहे. विराट कोहलीने हा सामना पलटवला. भारतीय संघाने दुबईत सलग चौथा विजय नोंदवला. तर त्याचवेळी भारत हारण्याची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाला पण टीम इंडियाने चांगलेच लोळवले. यापूर्वी पाकिस्तान संघ आणि आता ऑस्ट्रेलिया जिंकण्याचे भाकीत बाबाने केले होते. अभयसिंह यावेळी चांगलाच तोंडघशी आपटला आहे.

4 गड्यांनी मिळवला विजय

कांगारूंनी भारतीय संघासमोर 265 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हा मोठा पल्ला नव्हता. यावेळी ऑस्ट्रेलिया समोर असल्याने चाहत्यांची सुद्धा धाकधूक वाढली होती. यापूर्वी अनेकदा ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले नव्हते. त्याच आधारे आयआयटी बाबा अभय सिंह भारत हारण्याचे भाकीत करत होता. पण टीम इंडियाने 48 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयश्री खेचून आणला. 4 गड्यांनी टीम इंडिया जिंकली.

 बाबांना मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवा

आयआयटी बाबा यांनी यापूर्वी भारत -पाकिस्तानच्या सामन्यावेळी देवाच्या मनातच भारताला हरवण्याचे आहे. पाकिस्तान सामना जिंकणार आहे. टीम इंडियाने कितीही प्रयत्न केला तरी फायदा नाही असे भाकीत केले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले.

पाकिस्तानचा पराभव होताच आयआयटी बाबा चांगलेच ट्रोल झाले. क्रिकेट फॅन्सीनी बाबांवर शा‍ब्दिक बाण सोडले. त्यांची नेटिझन्सनी यथेच्छ शा‍ब्दिक धुलाई केली. बाबांना मेंटल म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तर काही टीम इंडिया फॅन्सनी बाबाला मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवण्याचा सल्ला दिला.

आज ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर अभय सिंह पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली आहे. बाबांवर क्रिकेट फॅन्स तुटून पडले आहेत. त्यांनी बाबांना अंतिम सामन्याची आणि पुढील भारतीय संघाविषयी कोणतेही भाकीत न करण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीतच बाबा गांजा पिऊन भविष्यवाणी करत असल्याचे फॅन्सचे म्हणणे आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.