
उत्तरकाशीच्या धराली भागात ढग फुटल्याने मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी ढग फुटल्याने अचानक आलेल्या पुरात किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५० लोक बेपत्ता झाले. डोंगरातून मलब्यासह पूर आला आणि नदीकाठच्या अनेक घरांचा नाश झाला. पोलीस, लष्कर, NDRF आणि SDRF च्या बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराच्या अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. पण ढग फुटी म्हणजे नेमकं काय? किती वेगाने पाणी खाली येते? चला जाणून घेऊया… ढग फुटणे म्हणजे काय? प्रथम, ढग फुटणे (Cloudburst) म्हणजे काय ते समजून घेऊया. जेव्हा ढग फुटतात, तेव्हा त्यातून पडणाऱ्या पाण्याचे...