AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जोडप्याने कंजुषी करून करून केली 12 कोटींची बचत, वयाच्या चाळीशीत घेतली रिटायरमेंट; आता…

एका ब्रिटिश जोडप्याने अतिशय कंजुषी करून तब्बल 12 कोटींहून अधिक बचत केली. हिटर न वापरणे, बाहेरून फोन चार्ज करणे आणि जेवणाचा डबा घेऊन जाणे अशा सवयींनी त्यांना वयाच्या चाळीशीत आर्थिक स्वातंत्र्य मिळवले. लवकर निवृत्त होऊन त्यांनी उधळपट्टी करणाऱ्या लोकांसाठी एक आदर्श घालून दिला आहे, जो बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व पटवून देतो.

या जोडप्याने कंजुषी करून करून केली 12 कोटींची बचत, वयाच्या चाळीशीत घेतली रिटायरमेंट; आता...
CoupleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2026 | 7:21 PM
Share

जगात अनेक प्रकारचे लोकं आहेत. काही आगळेवेगळे तर काही जगावेगळे आहेत. एक कपल हे जगावेगळ्या प्रकारात मोडतंय. या कपलने कंजुषीचा कळस गाठलाय. कंजुषी करत करत या कपलने तब्बल दोन चार लाख नव्हे तर 12 कोटी रुपये वाचवले आहेत. कंजुषीची हद्द म्हणजे त्यांनी सर्दीमध्ये हिटर सुद्धा लावला नाही. फोनचं चार्जिंगही बाहेरूनच केलं. अशा अनेक गोष्टी करत करत त्यांनी पै पै वाचवला. आज वयाच्या चाळीशीत निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्याकडे 12 कोटी रुपये आहेत. जगातील उधळ्या लोकांना आदर्श घालून देणारंच असं हे कपल आहे.

इंग्लंडमधील हे कपल आहे. एलन आणि केटी डोनेगन असं या दोघांचं नाव आहे. हे दोघे इंग्लंडच्या दक्षिणेकडे राहतात. इंग्लंडमध्ये दरवर्षी कडाक्याची थंडी असते. प्रत्येक घरातील प्रत्येक रुममध्ये हिटर लावलेलं असतं. उष्णता मिळवण्यासाठी हिटर लावलं जातं. पण एलन आणि केटी या दोघा महामानवांनी कधीच घरात हिटर लावलं नाही. थंडीत कुडकुडले, पण त्यांनी कधी हिटर लावलं नाही.

गरम पाण्याची बॉटल

इंग्लंड, अमेरिका, युरोप आणि आशियातील अनेक देशात भारतासारखा हिवाळा नसतो. या देशांमध्ये पारा मायनसच्या खाली जातो. त्यामुळे घराला गरम ठेवण्यासाठी फरशी आणि भिंतींना गरम करावं लागतं. त्यामुळे विजेचं बिल अधिक वाढतं. याबाबत एलन म्हणाला, घराला गरम करण्याऐवजी आम्ही अधिक कपडे घालायचो. गरम पाण्याच्या बॉटलचा वापर करायचो. आम्ही हा खेळ बनवला होता. हा त्रास नव्हता. तर तो आमच्या रणनीतीचा भाग होता.

लोक वेडे म्हणायचे…

आमचे पैसे वाचवण्याचे हे फंडे पाहून लोक आम्हाला वेडे समजायचे. पण आम्ही आमच्या गोष्टींवर ठाम होतो. आम्ही आमचं स्वातंत्र्य उपभोगत होतो, असं एलन म्हणाला. स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्यासाठी निवृत्ती. लवकर निवृत्त होणं. डोनेगन परिवाराने कंजुषी करून सात वर्ष आधीच निवृत्ती घेतली. त्यावेळी एलन 40 वर्षाचा होता तर केटी फक्त 35 वर्षाची होती.

क्वचितच हॉटेलात जेवले

हे दोघे क्वचितच बाहेर जेवायचे. एरव्ही ते घरूनच डबा घेऊन जायचे. केवळ लंचच्या त्या एका सवयीमुळे आम्ही 10 वर्षात 6 लाख रुपये वाचवले आहेत, असं एलनने सांगितलं. आम्ही बाहेर असल्यावर आमचे फोन चार्ज करायचो. फेकण्यात आलेले नेक्टर व्हाऊचर आम्ही शोधायचो. आता हा वेडेपणा आहे की समजूतदारपणा हे तुम्हीच ठरवा. पण असं केल्याने आम्हाला फायदा झाला, असं तो पुढे सांगतो.

चांगल्या नोकरीला

ट्रेनिंग आणि लाइफ कोचिंगचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एलन लँडस्केप गार्डनर म्हणून काम करायचा. तर केटी एका फायनॅन्शियल फर्ममध्ये एक्चुअरी वा रिस्क असेसेर होती. चांगली कमाई करण्याबरोबरच भरपूर बचत करण्याचा त्यांचा हेतू होता. लवकर निवृत्त होण्यासाठी त्यांचा हा प्लान होता. त्यामुळेच त्यांनी सर्व पैसा गुंतवला होता. आम्ही जो काही पैसा गुंतवला ते आयुष्याचं एक पाऊल होतं. आम्हाला तसं जगायचं होतं. जेव्हा आमची बचत 12 कोटी 73 लाख रुपये झाली तेव्हा मी नोकरी सोडली, असं केटी म्हणते.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन.

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी