‘Chopsticks अशा वापरायच्या, डार्लिंग!’ Video पाहून लोक म्हणाले, ‘प्रेम असावं तर असं!’

'Chopsticks अशा वापरायच्या, डार्लिंग!' Video पाहून लोक म्हणाले, 'प्रेम असावं तर असं!'
PIC Courtesy - Instagram /thapachinesewok

या सुंदर केमिस्ट्रीची गोष्ट सोशल मीडियातील लोकांना खूप भावली आहे. प्रेम असावं तर असं, अशा कमेंट करत लोकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात. हा क्षण किती छान आहे, किती विलक्षण सुंदर गोष्ट आहे, असं म्हणत अनेकांना अंकिता आणि साईनं जगलेला क्षण हवाहवासा वाटलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Dec 23, 2021 | 1:09 PM

प्रेमाचा (Love) आणि चॉपस्टिकचा (Chopstick) संबंध काय? असं तुम्ही म्हणाल. पण खरंच त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, यावर तुम्ही एक व्हिडीओ (Trending Video) पाहिल्यानंतर नक्कीच विश्वास ठेवाल. एका गोड दाम्पत्याचा गोंडस व्हिडीओ (Cute Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालाय. इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत एक नवदाम्पत्य रेस्टॉरंटमध्ये चायनीज (Chinese Restaurant) डिश असलेलं न्यूडल्स खात आहेत. त्यात नवरा बायकोला चॉपस्टिक्स कशा वापरायचा हे शिकवतोय. 10 लाखापेक्षा (1 Million) जास्त लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ सगळ्यांना भुरळ पाडतोय.

कोण आहेत ते नवरा बायको?

चायनीजच्या गाडीवर चमच्यानं न्यूडल्स (Noodles) खाणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, तर तुम्हाला चॉपस्टिक किती भारी गोष्ट आहे, हे कळणार नाही! न्यूडल्स जर चॉपस्टिक्सने खाता येणं, वाटतं तितकं सोप्प नाहीये. पण जर प्रेमानं कोणती गोष्ट शिकवली, तर कठीणही काहीच नाही! हा व्हिडीओ आपल्याला तेच तर सांगतोय.

साई गुरुंग (Sai Gurung) आणि त्याची पत्नी अक्षिता गुरुंग (Wife Akshita Gurung) एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथल्या रेस्टॉरंगमध्ये साईनं अक्षिताला चॉपस्टिकनं न्यूडल्स कसे खायचे, याचा आधी डेमो दिला. प्रेमानं चॉपस्टिक हातात धरुन न्यूडल्स अलगद तोंडात कशा ओढायच्या, हे इतक्या सफाईदारपणए दाखवलं की अक्षितानंही चमचा खाली ठेवून चॉपस्टिकनं न्यूडल्स खायचं धाडसं केलं. बसं.. प्रेम करण्यासाठी जसं धाडस लागतं, त्याचप्रमाणे दाखवलेल्या धाडसामुळे अक्षिताला फार कठीण गेलं नाही. नवऱ्यानं इतक्या मस्तपणे चॉपस्टिकचा वापर शिकवल्यानंतर तितक्याच मस्तपणे अक्षिकानं पहिल्याच प्रयत्नात चॉपस्टिकच्या मदतीनं न्यूडल्सचा पहिला खास घेतला.

या सुंदर केमिस्ट्रीची गोष्ट सोशल मीडियातील लोकांना खूप भावली आहे. प्रेम असावं तर असं, अशा कमेंट करत लोकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात. हा क्षण किती छान आहे, किती विलक्षण सुंदर गोष्ट आहे, असं म्हणत अनेकांना अंकिता आणि साईनं जगलेला क्षण हवाहवासा वाटलाय.

कुणी पोस्ट केला व्हिडीओ?

तर हा अत्यंत रोमॅन्टिंक (Romantic), सुंदर (Beautiful) आणि प्रेमात आकंठ बुडालेल्या दाम्पत्याचा व्हिडीओ शेअर केला, थापा चायनीज वोक या रेस्टॉरंटनं (Thapa Chinese Wok). आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकाऊंटवरुन थापा चायनीच वोकनं शेअर (Share) केलेल्या या व्हिडीओला 65 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईव्ह केलंय.

पाहा हा खास व्हिडीओ –

संबंधित बातम्या –

घरात 11 लोक, एकानंही दिलं नाही ‘Vote’! पराभवानंतर ढसाढसा रडला संतोष

Important | कोरोनाचा स्पर्मवर हल्ला! संशोधनातून खुलासा, कोरोनातून बरे झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

धक्कादायक! तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें