Important | कोरोनाचा स्पर्मवर हल्ला! संशोधनातून खुलासा, कोरोनातून बरे झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 23, 2021 | 10:46 AM

संशोधनातून ज्या बाबी समोर आल्या आहेत, त्यातून स्पर्मबाबतचे जे निष्कर्ष समोर आले आहेत, ते चिंता वाढवणारे आहेत. 120 जणांची या संशोधनावेळी चाचणी करण्यात आली. त्यातील सर्व जणांचं वय हे 35 वर्ष इतकं होतं. यातील सर्व रुग्ण हे 1 ते 2 महिन्यात बरे झाल्याचं समोर आलं होतं.

Important | कोरोनाचा स्पर्मवर हल्ला! संशोधनातून खुलासा, कोरोनातून बरे झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी
प्रातिनिधिक फोटो

तुम्ही कोरोनातून बरे झाले असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोनातून बरे झालेल्या पुरुषांबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनातून काळजी करायला लावणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत.

Omicron

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना झालेल्या रुग्णांवर नुकताच एक अभ्यास (Study) आणि संशोधन (Research) करण्यात आलं. त्यातून कोरोना (Corona/ Covid-19) होऊन गेलेल्या पुरुषांच्या स्पर्म(Sperm) म्हणजेच शुक्राणूंमध्ये घट झाली असल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय तर शूक्राणूंचा दर्जादेखील (Quality) खालावला असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.

कुणी केला रिचर्स?

लंडनमधील (London) एका विद्यापीठानं हे संशोधन समोर आणलंय. इंपीरियल कॉलेज (Imperial College London) ऑफ लंडननं बेल्जिअममधील (Belgium) 120 जणांची चाचणी (Test) केली. या चाचणीनंतर करण्यात आलेल्या संशोधनानंतर महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

स्पर्मची चिंता वाढवणारे निष्कर्ष

या संशोधनातून ज्या बाबी समोर आल्या आहेत, त्यातून स्पर्मबाबतचे जे निष्कर्ष समोर आले आहेत, ते चिंता वाढवणारे आहेत. 120 जणांची या संशोधनावेळी चाचणी करण्यात आली. त्यातील सर्व जणांचं वय हे 35 वर्ष इतकं होतं. यातील सर्व रुग्ण हे 1 ते 2 महिन्यात बरे झाल्याचं समोर आलं होतं. कोरोना झालेल्या पुरुषांच्या स्पर्म मोटिलिटी म्हणजेच शूक्राणूंची निर्मिती होण्याची क्षमता तसंच स्पर्म काऊंट यावर लक्षणीय परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या बाबतीत स्पर्म मोटिलिटी आणि स्प्रम काऊंट या दोन्हीमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.

संशोधनातली आकडेवारी काय सांगते?

कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रत्येकाचा बरा होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. त्यानुसार या संशोधनात काही महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आली. त्यातून खालील महत्त्वाची माहिती समोर आली होती. त्यानुसार खालील आकडेवारीप्रमाणे स्मर्म मोटिलिटी आणि स्पर्म काऊंटमध्ये घट झाल्याचं समोर आलंय.

एका महिन्यात बरे झालेल्या रुग्णांमध्ये

स्पर्म मोटिलिटी – 60% स्पर्म काऊंट – 37%

एक ते दोन महिन्यांत बरे झालेल्या रुग्णांमध्ये

स्पर्म मोटिलिटी -37% स्पर्म काऊंट – 29%

२ महिन्यापेक्षा जास्त महिन्यांनंतर

स्पर्म मोटिलिटी -28% स्पर्म काऊंट – 6%

Photo Source – Google

दरम्यान, हल्लीच कोरोनामुळे स्पर्म डोनर्स, फर्टिलिटी सेंटर याबाबतही महत्त्वाची महाराष्ट्रातली आकडेवारी समोर आली होती. कोरोनामुळे भविष्यात मूल होण्यात अडचणी येण्याचीही भीती या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे वेळीच कोरोनाचा धोका ओळखून संक्रमणापासून स्वतःला वाचवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याबाबतची खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI