खरंच? 1987 मध्ये फक्त इतक्या किलोने विकला जात होता गहू, 36 वर्षे जुनं बिल

| Updated on: Jan 03, 2023 | 5:23 PM

गव्हाच्या किंमतीमुळे लोक चकित झाले आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या आजोबांच्या सवयीचे कौतुक केले.

खरंच? 1987 मध्ये फक्त इतक्या किलोने विकला जात होता गहू, 36 वर्षे जुनं बिल
1987 bill
Image Credit source: Social Media
Follow us on

आधीच्या काळी खाण्यापिण्याची किंमत किती असेल याचा विचार तुम्ही नक्कीच केला असेल. 36 वर्षांपूर्वी गव्हाची किंमत फक्त 1.6 रुपये प्रति किलो होती. भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर 1987 च्या एका बिलाचा फोटो शेअर केला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विकल्या गेलेल्या गव्हाच्या उत्पादनाच्या जुन्या बिलामुळे लोकांना आश्चर्य वाटले. ‘जे फॉर्म’ची विक्री पावती आयएएफ अधिकाऱ्याने शेअर केली होती, जी त्याच्या शेतकरी आजोबांनी मंडईत विकली होती.

आयएएफचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विट केले की, “जेव्हा गहू 1.6 रुपये प्रति किलो असायचा. माझ्या आजोबांनी 1987  मध्ये गव्हाचं पीक फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विकलं होतं.”

ते म्हणाले की, त्यांच्या आजोबांना रेकॉर्ड ठेवण्याची सवय होती. “या कागदपत्राला जे फॉर्म असं नाव देण्यात आलं होतं. त्यांच्या संग्रहात गेल्या 40 वर्षांत विकल्या गेलेल्या पिकांची सर्व कागदपत्रे आहेत.

ही पोस्ट पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. गव्हाच्या किंमतीमुळे लोक चकित झाले आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या आजोबांच्या सवयीचे कौतुक केले.

एका युझरने लिहिले, “अप्रतिम. त्या वेळचे वडीलधारी लोक खर्च केलेल्या प्रत्येक पैशाची संपूर्ण माहिती लिहीत असत. अशा प्रकारे विकलेल्या पिकाची नोंद ठेवावी. दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “जे फॉर्म, शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज.” ‘जे फॉर्म’ हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा पुरावा आहे जो आपले पीक विकतो. जे फार्मच्या डिजिटायझेशनपूर्वी अनेक एजंट ही शेती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याऐवजी आपल्याजवळ ठेवत असत.