Traffic Challan : लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड?, चर्चांवर नितीन गडकरी यांचं मोठं विधान काय?
Traffic Challan on Sleepers: काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावे लागते. केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यात 2019 साली काही बदल करण्यात आले होते. त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात. बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
खरंतर चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा. अपघात झाल्यास पाय सुरक्षित राहू शकतील. आणि दुखापत कमी होईल. चप्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो.
चप्पल घालून बाईक चालवल्यास दंड होतो का ?
चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास दंड होईल, अशी कोणतीही अट मोटर वाहन कायद्यात नाही. असा कोणताही नियम कायद्यात नाही. त्यामुळेच चप्पल अथवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास चालान कापले जात नाही, म्हणजेच दंड होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. चप्पल घालणं, अर्ध्या बाह्यांच शर्ट, लुंगी -बनियान घालून बाईक चालवणं,गाडीचा आरसा खराब असणं अथवा गाडीत एक्स्ट्रॉ बल्ब नसणं अशा गोष्टींमुळे चालान कापला जात नाही. अफवांपासून सावध रहावे, असे या पोस्टवर लिहीण्यात आले होते.
अफवाहों से सावधान…!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
बूट घालून गाडी चालवण्याचे फायदे
जर तुम्ही बूट घालून गाडी तालवत असाल तर ब्रेक पॅडलवर चांगली ग्रिप (पकड) मिळते. पण चप्पल घातल्यास ती पकड मिळू शकत नाही. बऱ्याच वेला चप्पल पायतून घसरूनही शकते,त्यामुळे दुर्घटना, अपघात होण्याची शक्यता वाढते.
