मैत्रिणीसोबत बॉयफ्रेंडला OYOमध्ये नको तसं पाहिलं… बाजूचीच रुम घेतली अन् सकाळ होण्यापूर्वीच…; कुणाच्या मृत्यूने हादरले सगळे?

एका महिलेने तिच्या मैत्रिणीसोबत बॉयफ्रेंडला पाहिले. त्यानंतर तिने त्यांच्या हॉटेलच्या शेजारची खोली बूक केली. नंतर जे घडलं पोलीसही हादले. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया सविस्तर...

मैत्रिणीसोबत बॉयफ्रेंडला OYOमध्ये नको तसं पाहिलं... बाजूचीच रुम घेतली अन् सकाळ होण्यापूर्वीच...; कुणाच्या मृत्यूने हादरले सगळे?
Woman catches boyfriend cheating
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 06, 2025 | 1:22 PM

प्रेमाचा त्रिकोण तयार होणे आणि त्यामधून मग त्याचे वाईच परिणाम होण्याच्या घटना अनेकदा कानावर येतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या बॉयफ्रेंडला जवळच्या मैत्रिणीसोबत OYO हॉटेलमध्ये रंगेहात पकडले. त्यानंतर जे घडलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका महिलेने प्रेमप्रकरणात फसवणूक झाल्याने टोकाचे पाऊल उलचले. खरे तर, मृतक महिलेचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. तिने आपल्या मैत्रिणीची आपल्या प्रियकराशी ओळख करून दिली होती. त्यानंतर त्या दोघांमध्येही प्रेमप्रकरण सुरू झाले. दरम्यान, त्या महिलेला माहिती मिळाली की तिची मैत्रीण आणि प्रियकर एका ओयो हॉटेलमध्ये थांबले आहेत. जेव्हा ती हॉटेलवर पोहोचली, तेव्हा तिने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिने तिथेच फाशी घेऊन आपले जीवन संपवले.

वाचा: खराब झालेली दारू कशी ओळखावी? तज्ज्ञाने सांगितल्या सोप्या 3 पद्धती, नक्की तापासून पाहा

आत्महत्येची संपूर्ण घटना बंगळुरूच्या बसवेश्वर नगरातील ओयो चॅम्पियन कम्फर्ट लॉज येथील आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराला आपल्याच मैत्रिणीसोबत रंगेहाथ पकडले. भांडणानंतर त्या महिलेने तिथेच एक खोली बुक केली आणि पंख्याला लटकून आत्महत्या केली. मृतक महिलेची ओळख यशोदा (वय 38) अशी झाली आहे, जी आधीच विवाहित होती आणि तिला दोन मुलेही आहेत.

सात वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण

यशोदाला दोन मुले असूनही तिचे विश्वनाथ नावाच्या एका ऑडिटरसोबत अनैतिक संबंध होते. यशोदा आणि विश्वनाथ शेजारी राहत होते, त्यामुळे त्यांचे प्रेमप्रकरण पहिल्या भेटीतच फुलले. सात वर्षे दोघेही प्रेमाच्या नावाखाली मस्ती करत होते, पण नुकतेच यशोदाने आपल्या एका मैत्रिणीची विश्वनाथशी ओळख करून दिली. सात वर्षांपासून यशोदासोबत संबंध ठेवणारा हा व्यक्ती यशोदाच्या मैत्रिणीशी लपूनछपून भेटू लागला.

हॉटेलमध्ये महिलेने केली आत्महत्या

दरम्यान, हळूहळू यशोदाला दोघांवर संशय येऊ लागला. एका दिवशी तिला समजले की विश्वनाथ आणि तिच्या मैत्रिणीचे प्रेमप्रकरण सुरू आहे, ते दोघे मागील रात्री बसवेश्वर नगरातील केएचबी कॉलनी येथील ओयो चॅम्पियन कम्फर्ट लॉजमध्ये होते. लॉजवर पोहोचल्यावर यशोदाने दोघांना एकत्र पकडले. त्यानंतर तिघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यानंतर यशोदाने तिथेच आपल्या प्रियकराच्या शेजारच्या खोलीत बुक करून फाशी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.