हिंदुस्तान जिंदाबाद! तिरंग्यासाठी लंडनमध्ये भारतातील मुस्लिम मुली पाकिस्तान्यांशी भिडल्या, अंगावर शहारे आणणार Video

यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान लंडनच्या रस्त्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय मुसलमान मुली पाकिस्तानी मुलांशी भिडताना दिसत आहेत.

हिंदुस्तान जिंदाबाद! तिरंग्यासाठी लंडनमध्ये भारतातील मुस्लिम मुली पाकिस्तान्यांशी भिडल्या, अंगावर शहारे आणणार Video
Viral video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 19, 2025 | 1:23 PM

ब्रिटनची राजधानी लंडन येथे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी लंडनच्या रस्त्यांवर उतरलेल्या भारतीयांशी पाकिस्तानी नागरिकांनी गैरवर्तन केले. त्यांनी भारतीय मुली आणि त्यांच्या मित्रांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण या भारतीय मुसलमान मुली अजिबात घाबरल्या नाहीत. त्या या पाकिस्तानी मुलांशी भिडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानी नागरिकांनी भारतीयांकडून तिरंगा हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या मुस्लिम मुलींनी त्यांना सडेतोड उत्तर देत माघार घ्यायला भाग पाडले आणि “हिंदुस्तान जिंदाबाद”च्या घोषणा दिल्या. लंडनच्या रस्त्यांवर भारतीय मुलींना त्रास देणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिडीओ समोर आला आहे.

वाचा: पुतिनला एकदाच सायको म्हणाली, नंतर मॉडेल BMSमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडली,नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी गुंडांच्या गैरवर्तनाला सणसणीत प्रत्युत्तर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, एक मुस्लिम मुलगी तिरंगा हातात घेऊन आपल्या मित्रांसोबत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करत आहे. याचवेळी काही पाकिस्तानी नागरिक येऊन गैरवर्तन करू लागतात. मात्र, ही मुलगी घाबरत नाही आणि इतक्या ताकदीने प्रत्युत्तर देते की, पाकिस्तानी नागरिकांना तिथून चुपचाप निघून जावे लागते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या मुलीच्या धाडसाचे आणि पाकिस्तानी गुंडांना सामोरे जाण्याच्या हिमतीचे कौतुक केले आहे.

लंडनच्या रस्त्यांवर वारंवार होणारा संघर्ष

लंडनच्या रस्त्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांमधील संघर्ष ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान लंडनच्या रस्त्यांवर दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या नागरिकांनी आपापल्या सरकारच्या समर्थनार्थ लंडनच्या रस्त्यांवर निदर्शने केली होती, ज्यामुळे संघर्षाची परिस्थिती उद्भवली. यावेळी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनात एका दिवसाचा फरक आहे. पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्टला, तर भारतात 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.