हॅलो श्रीनगर, बाय बाय स्वित्झर्लंड… आनंद महिंद्रांनी शेअर केले हुडहुडी भरवणारे सुंदर Photos

आम्ही तुमच्यासाठी सुंदर असे फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्हाला हुडहुडी भरल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो (Photos) शेअर केले आहेत, उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी...

हॅलो श्रीनगर, बाय बाय स्वित्झर्लंड... आनंद महिंद्रांनी शेअर केले हुडहुडी भरवणारे सुंदर Photos
श्रीनगर
| Updated on: Jan 16, 2022 | 4:02 PM

सध्या थंडी(Winter)चा मौसम आहे. अनेक ठिकाणी पारा खाली उतरलाय. राज्यात हुडहुडी भरलीय. आपल्याकडे तापमान (Temperature) दहाच्या आसपास असलं तरीसुद्धा थंडी वाजते. मात्र उत्तरेत तर प्रचंड थंडी असते. याठिकाणी पारा 10 काय शुन्याच्याही खाली गेलेला असतो. अशावेळी तिथला नजारा पाहूनच आपल्याला हुडहुडी भरल्याशिवाय राहत नाही. आता आम्ही तुमच्यासाठी सुंदर असे फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्हाला हुडहुडी भरल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो (Photos) शेअर केले आहेत, उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी…

जम्मू काश्मीरमधल्या थंडीचे फोटो

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते विविध ठिकाणचे व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करत असतात. त्यातले अनेक व्हिडिओ प्रेरणादायी असतात. काही व्हिडिओ ठिकाणाची माहिती देणारे असतात. तर काही आश्चर्यकारक असे असतात. आता महिंद्रा यांनी जम्मू काश्मीरमधल्या थंडीचे फोटो पोस्ट केले आहेत. श्रीनगर इथले हो फोटो आहेत.

म्हणूनच तर काश्मीरला म्हटलं जातं स्वर्ग

शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे आपल्या काश्मीरमध्ये थंडी पडली आहे. एवढी की सर्व ठिकाणी बर्फ साचला आहे. घरं, रस्ता अशी सर्वच ठिकाणं बर्फाच्छादित झाली आहेत. म्हणूनच तर काश्मीरला स्वर्ग म्हटलं जातं. आता शेअर केलेल्या या फोटोंना पाहून तुम्हीही म्हणाल, हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. श्रीनगरमधील हे फोटो महिंद्रांनी शेअर केले असून कॅप्शन दिलंय, की हॅलो श्रीनगर, बाय बाय स्वित्झर्लंड…

ट्विटरवर शेअर

ट्विटरवर त्यांनी हे सुंदर फोटो शेअर केले असून 35 हजारांहून अधिक यूझर्सनी याला लाइक केलंय. अनेकजण यावर कमेंट्सही करत असून अॅमेझिंग, वाव अशाप्रकारच्या कमेंट्स करून याविषयी आपलं प्रेमही व्यक्त करत आहेत. अनेकजण हार्टची इमोजी टाकून त्याला दाद देत आहेत.

Viral : यूझर्सना भावला मांजरीचा ‘किलर कम इमोशनल’ लूक, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Video

Viral Video of Father-Son : वडिल-मुलाचा अनोखा खेळ, तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही

Viral : अप्रतिम व्हॉलिबॉल खेळणाऱ्या चिमुरड्याचा Video पाहून यूजर्स म्हणतायत, ‘ये बच्चा नहीं बिजली है’