Lifestyle : ऐकावं ते नवलच, इन्फेक्शननं लिंग गळालं, डॉक्टरांनी नवं जोडलं तेही हातावर, पुढं जे घडलं ती सहा वर्षांची वेदना

| Updated on: May 07, 2022 | 7:31 PM

ही झाली मॅल्कमची गोष्ट. पण लिंग गळून पडलेलं असताना, नवं कृत्रिम लिंग बसवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आणि ते वैद्यकिय क्षेत्रात महत्वाचं मानलं जातंय कारण ते एक संवेदनशिल ऑपरेशन होतं.

Lifestyle : ऐकावं ते नवलच, इन्फेक्शननं लिंग गळालं, डॉक्टरांनी नवं जोडलं तेही हातावर, पुढं जे घडलं ती सहा वर्षांची वेदना
Image Credit source: ANI
Follow us on

काही काही घटना आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या असल्या तरी सुद्धा इतरांसाठी मात्र त्या वेदनादायी असू शकतात. इंग्लंडमधली (England) एक घटना अशीच आहे. नॉरफोक नावाचा भाग आहे, तिथं 47 वर्षांचे एक गृहस्थ रहातात. त्यांच्या हाताला चक्क पेनिस (The Man with a Penis on his Arm) आहे. त्यांचं नाव आहे मॅलकम मॅक्डोनाल्ड. गेल्या सहा वर्षापासून ते हाताला असलेलं पेनिस घेऊन फिरत असतात. काम करतात. इतर सगळ्या गोष्टी सामान्य माणसांप्रमाणेच. पण त्यांच्या हाताला पेनिस हे काही जन्मजात नाही. सहा वर्षापूर्वी एक घटना घडली आणि त्यात काही कॉम्पलिकेशन तयार झाले. त्यानंतर त्यांच्या हाताचं लिंग जशास तसं होतं. शेवटी डॉक्टरांनी सर्जरी करुन ते ज्या जागी असायला हवं तिथं फिट्ट केलंय.

नेमकं काय घडलं मॅल्कमसोबत?

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार 2010 साली मॅल्कम मॅक्डोनाल्ड यांना इन्फेक्शन झालं. ते इतकं गंभीर होतं की, एकेदिवशी त्यांचं पेनिस गळालं आणि खाली फ्लोअरवर पडलं. त्याच अवस्थेत त्यांनी दवाखाना गाठला. डॉक्टरांकडे सर्जरीशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी एक नवं कृत्रिम पेनिस तयार केलं. त्यासाठी मॅल्कमच्या डाव्या हातावर स्किनचा फ्लॅप तयार केला गेला. प्रत्यक्ष सर्जरीला सुरुवात झाली. अर्थातच ती कठिण होती. सर्जरी सुरु असतानाच मॅल्कमच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. डॉक्टरांनी ऑपरेशन मधातच थांबवलं. परिणाम मॅल्कमच्या डाव्या हातावर जे पेनिस तयार केलं होतं ते तात्पुरत्या काळासाठी तसच ठेवावं लागलं.

हे सुद्धा वाचा

लोक काय म्हणाले?

डाव्या हाताला लावलेल्या पेनिससह मॅल्कम यांना एक नाही, दोन नाही तर सहा वर्षे काढावी लागली. पेशानं ते मेकॅनिक आहेत. त्यांच्या हाताला लटकलेलं लिंग बघून अनेक जण हसायचे, त्यांची चेष्टा करायचे. ते म्हणतात, हातावर पेनिस असलेला माणूस तुम्हाला रोज तर दिसत नाही. मीही त्याला मजेशीर भाग म्हणूनच बघायला लागलो. माझ्याकडे खरं तर कुठला पर्यायच नव्हता. मॅल्कम यांच्यावर एक डॉक्युमेंटरीही काढली गेलीय. तिचं नाव आहे- The Man with a Penis on his Arm.

आता काय स्थिती आहे मॅल्कमची?

सहा वर्षानंतर म्हणजेच 2021 मध्ये मॅल्कमवर अखेर दुसरी यशस्वी सर्जरी पार पडली. डॉक्टर एक कृत्रिम पेनिस बसवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मॅल्कम यांना पुन्हा एकदा स्वत:च्या पुरुषत्वाचा नव्यानं साक्षात्कार होत असल्याचं वाटतंय. नव्यानं लिंग बसवल्यामुळे मॅल्मकचं लैंगिक जीवनही पुन्हा बहरल्याचं त्यानच सांगितलंय. तेही पहिल्यापेक्षा जास्त ताकदीनं. खुप उशिर होण्याआधी डॉक्टरांनी हे केल्याचं मॅल्कम मिश्किलपणे सांगतात.

ही झाली मॅल्कमची गोष्ट. पण लिंग गळून पडलेलं असताना, नवं कृत्रिम लिंग बसवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आणि ते वैद्यकिय क्षेत्रात महत्वाचं मानलं जातंय कारण ते एक संवेदनशिल ऑपरेशन होतं.