खुल जा सिम सिम! झारखंडमध्ये सापडला 14 कोटीं वर्षांपूर्वीचा ‘खजिना’; वैज्ञानिकांचा भांगडा, आता फायदाच फायदा

Petrified Fossil Found : झारखंड येथील एका मोठ्या विशाल वृक्षाच्या खाली वैज्ञानिकांना खजिना सापडला. हा खजिना जवळपास 14.5 कोटी वर्षांपूर्वींचा आहे. बरमसिया नावाच्या गावात ही नैसर्गिक संपत्ती सापडली आहे. त्याची एकच चर्चा सुरू आहे.

खुल जा सिम सिम! झारखंडमध्ये सापडला 14 कोटीं वर्षांपूर्वीचा खजिना; वैज्ञानिकांचा भांगडा, आता फायदाच फायदा
सापडला खजिना
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 01, 2025 | 10:15 PM

झारखंडमध्ये भूवैज्ञानिकांच्या हाती एक मोठा आणि अजब खजिना हाती लागला. अनेक दिवसांपासून या नैसर्गिक संपत्तीच्या मागे वैज्ञानिक तहान भूक हरपून लागले होते. अखेर त्यांच्या हाताला तो अनमोल खजिना लागलाच. झारखंड येथील एका मोठ्या विशाल वृक्षाच्या खाली वैज्ञानिकांना खजिना सापडला. हा खजिना जवळपास 14.5 कोटी वर्षांपूर्वींचा आहे. बरमसिया नावाच्या गावात ही नैसर्गिक संपत्ती सापडली आहे. त्याची एकच चर्चा सुरू आहे. या ठिकाणी एका पेट्रीफाईड जीवाश्माचा शोध लागला आहे.

वैज्ञानिकांनी काय दिली माहिती

झारखंड मध्ये भूवैज्ञानिकांच्या हाती एक अनोखा खजिना लागला आहे. ही नैसर्गिक संपत्ती जवळपास 14.5 कोटी वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. भूवैज्ञानिक डॉ. रंजीत कुमार सिंह आणि वनविभागाचे अधिकारी रामचंद्र पासवान यांच्या चमूने हा शोध लावला. मंगळवारी पाकूड जिल्ह्यातील बरमसिया गावातील एका डेरेदार मोठ्या झाडाखाली वैज्ञानिकांना पेट्रोफाईड जीवाश्म सापडले.

या शोध मोहिमेचा फायदा तरी काय?

वनाधिकारी रामचंद्र पासवान यांना या संशोधनानंतर गावकरी, स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यांनी ही संपत्ती जतन करण्यासाठी त्यांचे सहकार्य मागितले. तसेच या साईटवर कोणत्याही प्रकारचे अवैध काम, उपक्रम न राबवण्याचे आवाहन केले. या शोधामुळे या परिसरात पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस मिळेल. या साईटवर भू-वैज्ञानिक, पर्यावरण शास्त्राचे संशोधक आणि इतर संशोधकांना संशोधनासाठी वाव मिळेल. पर्यावरण, जैव विविधतेसाठी आणि निसर्गाचे विविध पैलू उलगडण्यासाठी हे संशोधन बहुमोल ठरणार आहे.

पेट्रीफाईड जीवाश्म

ही साईट इतर डोंगररांगापेक्षा एकदम वेगळी आहे. डॉ. रणजीत कुमार सिंह यांच्या म्हणण्यांनुसार, पाकूड जिल्हा हा पेट्रोफाईल जीवाश्मांचा खजिना आहे, या जीवाश्मांने तो समृद्ध आहे. विज्ञान शाखेत रूची असणाऱ्या हजारो सर्वसामान्य नागरिकांना हा नैसर्गिक खजिना याच देही, याची डोळा पाहता येईल. पण त्यासाठी त्याचे संवर्धन, जतन करणे आवश्यक आहे. या परिसरात नवीन संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच नैसर्गिक संपत्तीवरील अतिक्रमण रोखणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे संरक्षण आणि जतन करण्याची गरज असल्याचे डॉ. रणजीत कुमार सिंह म्हणाले.