शाब्बास शेरणी! खण, खण खण, 14 चापटांमध्येच मजनूला आठवले अब्बाजान, हा Video मिस करू नका

Kanpur Market Viral Video : या तरुणीच्या धाडसाचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मुख्य बाजारात सतत छेड काढणार्‍या तरुणाला, या तरुणीने दिवसा तारे दाखवले. तिचे चंडिकेचे रूप पाहून तो गयावया करू लागला. काय घडले भर रस्त्यात?

शाब्बास शेरणी! खण, खण खण, 14 चापटांमध्येच मजनूला आठवले अब्बाजान, हा Video मिस करू नका
१४ वेळा कानशिलात
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Feb 27, 2025 | 4:30 PM

पुण्यातील स्वारगेट बस आगारात तरुणीवर अत्याचाराच्या घटनेने समाजमन सुन्न झाले. तर दुसर्‍या एका तरुणीने कॅब चालकाविरोधात पोलिसांविरोधात धाव घेतली. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मुख्य बाजारातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका तरूण, तरुणीची छेड काढत होता. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. पण त्याचे चाळे असह्य झाल्यावर तिच्या संतापाचा कडेलोट झाला. तिने एक, दोन नाही तर 14 चापटा त्याला लगावल्या. या तरुणीने या विकृताला दिवसा तारे दाखवले. तिचे चंडिकेचे रूप पाहून तो गयावया करू लागला. काय घडले भर रस्त्यात?

नेमकं घडलं काय?

यासंबंधीचे वृत्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक आघाडीच्या माध्यमांनी दिलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बेकनगंज बाजारातील आहे. बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. त्याचवेळी ही तरुणी, तरुणाला दे दणा दण चापटा मारताना दिसते. तरुणीच्या आरोपानुसार, विकृताने तिची अगोदर छेड काढली. नंतर तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओत ही तरुणी संतापलेली दिसत आहे. तिने तरुणाची कॉलर धरून त्याची कानफटं सोली. या तरुणीने त्याला खाली बसवत, त्याची कानशीलं लाल केली. तिचे रौद्ररूप पाहून तरुणाची बोबडी वळलेली दिसून येते. तरूण तिच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. पण ती त्याचे कानाचे सतत माप काढताना दिसते. तिचा राग काही केल्या शांत होत नाही. तेव्हा आजूबाजूचे लोक तिला समजावून सांगताना दिसतात. पण इतक्या गर्दीतून एकही महिला अथवा पुरूष तिच्या मदतीला, विचारपूस करायला येत नाही. त्यामुळे आपल्या समाजाला झालंय तरी काय? असा सवाल कमेंटमध्ये दिसून येतो. तर अनेक जण तिच्या धाडसाचे कौतुक करतात. अनेकांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तिच्यासारखंच तरूणींनी अशा टपोरींना धडा शिकवावा असे मत मांडले.

विकृताची ओळख पटली

कानपूर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. या आरोपीचे नाव अदनान असल्याचे समोर आले आहे. तो बजारिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजीची आहे. आरोपीचे वडील हयात नाही. पण तरुणीने त्याला त्याच्या अब्बाजानची आठवण करून दिली. त्याला आयुष्यभराचा धडा शिकवला.