प्रत्येक विवाहित मुलीच्या या तीन इच्छा, तिच्या मनात तरी काय, जाणून घ्या
Married Girl Wishes : लग्नानंतर प्रत्येक मुली सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. आपल्यासाठी कोणी ताजमहल बांधावा अशी काही त्यांची इच्छा नसते. काहींना एक प्रेमाची मिठी, प्रेमाची हाक सुद्धा पुरेशी होते. तिच्या मनात तरी असते काय? जाणून घ्या..

लग्न हे दोन जीवांचे मिलन आहे असे म्हणतात. संसाराची दोन चाकं मिळाली की रस्ता जाणवत नाही की आठवत नाही. पण त्यासाठी दोघांचा एकमेकांविषयी ओढा, आपुलकी, प्रेम, आदर आवश्यक असतो. आपला सुखी संसार असावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. नवऱ्याने आपल्याला चंद्र तारे नाही दिले, पण त्याचा वेळ दिला तरी अनेकांना आकाश ठेंगणे होते. लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी येते, तेव्हा तिच्या मनात मंतरलेली स्वप्न असतात. तिने लग्नापूर्वी कुठं तरी डोक्यात सजवलेली ती स्वप्न घेऊन ती मुलाच्या घराचा उंबरठा ओलांडते. त्या हळव्या भावनांना अर्थातच नवरोबाची साथ हवी असते. काय असतात तिच्या भावना? काय हवे असते तिला?
स्त्रीला कोण ओळखू शकतो?
स्त्रीयांच्या मनात काय सुरू आहे, हे भल्याभल्यांना ओळखता येत नाही, असे म्हणतात. तिचे मन वाचणारी नजर हमखास धोका खाते, त्यांचा अंदाज चुकतो. स्त्रीला वाटतं एक आणि पुरुषाच्या मनात असते भलतेच, असा हा लपंडावच संसाराची गोडी वाढवतो. तो तिला बुद्ध वाटतो, तर ती त्याला भाबडी वाटते. पण सासरी येणाऱ्या मुलींच्या मनात असते तरी काय?
1. काळजी – पतीने आपली काळजी घ्यावी, अशी अपेक्षा स्त्री करते. पत्नीची नेहमी अपेक्षा असते की नवऱ्याने तिची काळजी घ्यावी. तिची बाजू जाणून घ्यावी. पत्नीचे रक्षण आणि काळजी ही पतीची जबाबदारीच आहे. कारण पत्नी ही नेहमी पतीची काळजी करते. त्याची वाट पाहते. त्याला हवं नको ते बघते. त्याला दुखलं, खुपलं तर ती बेचैन होते.
2. प्रामाणिकपणा – प्रामाणिकपणा हा पुरुषांचाच नाही तर स्त्रीयांचा सुद्धा दागिणा आहे. जी स्त्री अथवा पुरूष दोघांनी त्यांच्या जोडीदारासोबत प्रामाणिक असणे आवश्यक आहे. यातील एकानेही धोका दिला. किंवा त्याचे वाकडे पाऊल पडलं तर संसाराचा इस्कोट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पत्नीची पतीकडून प्रामाणिकपणाचीच अपेक्षा असते.
3. प्रेम, प्रणय – विवाहितेला पतीकडून प्रेमाची अपेक्षा असते. प्रणय हा पण संसारातील एक महत्त्वाचा घटक आहे. पतीने आपल्या पत्नीला एक खास वेळ दिला पाहिजे. तिच्याशी गप्पा मारायला हवा. त्याने तिच्या आवडी-निवडी जोपासणे आवश्यक आहे.