चिमुकल्याच्या एका मागणीने शिक्षण विभागाची धावपळ; अंगणवाडीच्या जेवणात मोठा बदल, सरकारचा मोठा निर्णय, Video पाहा

Anganwadi Meal Menu Change : अंगणवाडीतील सपक उपम्याने एका लहानग्याचं डोकं भनभनलं, मग काय या पठ्ठ्यानं मोठी मागणी केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षण खात्याला घाम फुटला. त्यानंतर महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांनी अंगणवाडीच्या जेवणात मोठा बदल केला.

चिमुकल्याच्या एका मागणीने शिक्षण विभागाची धावपळ; अंगणवाडीच्या जेवणात मोठा बदल, सरकारचा मोठा निर्णय, Video पाहा
अंगणवाडीतील जेवणातील पदार्थ बदलणार
| Updated on: Feb 04, 2025 | 2:11 PM

सरकारी शाळा, अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार देण्यात येतो. त्यामध्ये जास्त करून लवकरच पचतील असे पदार्थ असतात. मुलांचा वयोगट पाहता पदार्थ जास्त तेलकट, तुपकट, तिखट नसतात. पण केरळ राज्यातील एका अंगणवाडीत एक वेगळाच प्रकार घडला. गणवाडीतील सपक उपम्याने एका लहानग्याचं डोकं भनभनलं, मग काय या पठ्ठ्यानं मोठी मागणी केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षण खात्याला घाम फुटला. त्यानंतर महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांनी अंगणवाडीच्या जेवणात मोठा बदल केला.

शंकूचा व्हिडिओ व्हायरल

तर थरनूल एस शंकर याला लाडाने शंकु अशी आई हाक मारते. त्याने त्याच्या आईसमोर अंगणवाडीतील जेवणाविषयी लाडीक सुरात एक गऱ्हाणे मांडले. जेवणात नेहमी उपमा देत असल्याने तो नाराज झाला. त्याने अंगणवाडीत बिर्याणी अथवा चिकन फ्राय हवंय, उपमा नको, असा लकडा लावला. त्याचा हा व्हिडिओ आईने सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता तो एकदम व्हायरल झाला. त्याच्या व्हिडिओची दखल आरोग्य, महिला आणि बाल कल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली.

मंत्री वीणा जॉर्ज यांचे मेन्यू तपासण्याचे आदेश

केरळच्या महिला आणि बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज पर्यंत हे प्रकरण गेले. त्यानंतर त्यांनी अंगणवाडी आहारात मुलांना कोणते कोणते पदार्थ देण्यात येतात, त्याचा तपास केला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सर्वच अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीचे, पोषणाचे पदार्थ देण्यात येतात की नाही, याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या नवीन बदलामुळे कदाचित शंकुला त्याचा आवडीचा पदार्थ अंगणवाडीत मिळू शकतो.


अंगणवाडी होणार स्मार्ट

केरळ सरकारने राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे रुपडे पालटण्याचे ठरवले. आता अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहे. यामध्ये अभ्यासिका, विश्रांतीकक्ष, स्वयंपाकघर, स्टोअर रूम, बगिचा, मुलांना ऋतुमानानुसार खेळण्यासाठी खोलीतील आणि मैदानावरील खेळांचा समावेश त्यात असेल. तर अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षकांचे वेतन वाढवण्यात येणार आहे.