Kerala High Alert: CPI(M) राज्य मुख्यालयावर देशी बॉम्ब फेकल्याने केरळ हाय अलर्टवर! बॉम्ब फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

Kerala High Alert: 'राज्यात निर्माण झालेल्या तणावामुळे आम्ही सतर्क आहोत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राहील, याची काळजी पोलिस घेतील

Kerala High Alert: CPI(M) राज्य मुख्यालयावर देशी बॉम्ब फेकल्याने केरळ हाय अलर्टवर! बॉम्ब फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल
CPI(M) राज्य मुख्यालयावर देशी बॉम्ब फेकल्याने केरळ हाय अलर्टवर!
Image Credit source: TV9 marathi
रचना भोंडवे

|

Jul 01, 2022 | 4:28 PM

तिरुअनंतपुरम: गुरुवारी, (30 जूनच्या रात्री) तिरुअनंतपुरम येथील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) (CPI-M) मुख्यालयावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आल्याने केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडी (LDF) आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये तणाव वाढलाय. एक इसम दुचाकरीवर येऊन क्रूड बॉम्ब फेकतो असं इथल्या सीसीटीव्हीत कैद झालेलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Kerala Bomb Video Viral) झालाय. ‘राज्यात निर्माण झालेल्या तणावामुळे आम्ही सतर्क आहोत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राहील, याची काळजी पोलिस घेतील,’ असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सांगितले.

बॉम्ब फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

सीसीटीव्ही दृश्यांमध्ये रात्री 11.30 च्या सुमारास एकेजी सेंटर येथे एक दुचाकी चालक स्फोटक फेकताना दिसत आहे. मुख्यालयात थांबलेल्या नेत्यांनी सांगितले की त्यांनी जोरदार स्फोट ऐकला. या घटनेच्या चौकशीसाठी तज्ज्ञांचे पथक पक्षाच्या राज्य मुख्यालयात दाखल झाले होते.

दोन्ही पक्षांच्या पक्ष कार्यालयांना संरक्षण

वरिष्ठ नेत्यांसह पक्षाचे शेकडो कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या राजधानीत मोर्चा काढला. राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय. तसेच केरळ पोलिसांनी सीपीआय (एम) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पक्ष कार्यालयांना संरक्षण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

घटनास्थळाची पाहणी

पोलिसांना तातडीने सतर्क करण्यात आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. बॉम्ब पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. एकेजी सेंटरच्या अधिकृत मीडिया ग्रुपच्या माध्यमातून सीपीआय (एम) ने प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही व्हिज्युअलमध्ये एक व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचली आणि इमारतीवर “बॉम्ब” फेकत घटनास्थळावरून पळून जात असल्याचे दिसून आले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें