VIDEO: महिलेच्या अंगावर बसलेल्या पोलिसाचा फोटो व्हायरल, अखिलेश यादवांकडून हल्लाबोल

| Updated on: Jul 19, 2021 | 5:15 AM

एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या अंगावर बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तो फोटो ट्विट करत उत्तर प्रदेशमधील योग सरकारवर हल्लाबोल केलाय.

VIDEO: महिलेच्या अंगावर बसलेल्या पोलिसाचा फोटो व्हायरल, अखिलेश यादवांकडून हल्लाबोल
Follow us on

लखनौ : एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या अंगावर बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तो फोटो ट्विट करत उत्तर प्रदेशमधील योग सरकारवर हल्लाबोल केलाय. “उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारची कृपादृष्टी असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलिसांची प्रतिमा खराब होत आहे. भाजप सरकारच्या काळात या प्रकारांची कमतरता नाही. हे निंदनीय आहे,” असं मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं. त्यांनी ट्विट करत सरकारवर टीका केलीय (Know facts behind viral photo and video of UP Police on women chest).

अखिलेश यादव यांनी एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या अंगावर बसल्याचा फोटो ट्विट केलाय. या ट्विटच्या शेवटी भाजप नको आहे असा हॅशटॅगही वापरला. विशेष म्हणजे हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. यावरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर सडकून टीकाही होत आहे. त्यानंतर यूपी पोलीस खडबडून जागे झाले.

कानपूर देहात पोलीस अधीक्षकांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “संबंधित महिलेने पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली होती. त्यानंतर झटापटीत ते दोघे खाली पडले. यावेळी महिला खाली तर पोलीस अधिकारी वर होता. मात्र, महिलेने पोलीस अधिकाऱ्याची कॉलर सोडल्यानंतर ते तिथून निघून गेले.”

पोलिसांनी या घटनेचा एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. यात महिलेने पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडलेली स्पष्ट दिसत आहे. अधिकाऱ्याने कॉलर सोडण्यास सांगितल्यानंतर आणि तेथे उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यानंतर महिला कॉलर सोडते. त्यानंतर पोलीस अधिकारी तेथून निघून जातो.

नेमका घटनाक्रम काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस अधिकारी गावात एका आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले होते. तेथे एका तरुणाने पोलिसांशी गैरवर्तन केलं. त्यामुळे त्या तरुणाला तेथून दूर नेण्यात आलं. त्यानंतर त्या तरुणाच्या नातेवाईक महिलेने पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली. यावेळी झटापटीत दोघेही खाली पडले. तेव्हाचाच तो फोटो आहे.”

दरम्यान महिलेच्या तक्रारीवरुन संबंधित पोलीस अधिकाऱ्याला त्यावर आपली बाजू मांडण्यास सांगितलंय. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

VIDEO: “भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

“उत्तर प्रदेशमध्ये हिंसेचं नाव मास्टरस्ट्रोक ठेवलंय”, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

‘…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’, जयंत पाटील यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

Know facts behind viral photo and video of UP Police on women chest