AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उत्तर प्रदेशमध्ये हिंसेचं नाव मास्टरस्ट्रोक ठेवलंय”, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यानंतर काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केलाय.

उत्तर प्रदेशमध्ये हिंसेचं नाव मास्टरस्ट्रोक ठेवलंय, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
priyanka gandhi - rahul gandhi
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 11, 2021 | 7:36 AM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यानंतर काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) हिंसेचं नाव बदलून मास्टरस्ट्रोक ठेवण्यात आलंय, असं म्हणत राहुल गांधींनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘हिंसा प्रदेश’ झालाय, असा आरोप काँग्रेसने केलाय (Rahul Gandhi and Priyanka Gandhi criticize Yogi government over violence in UP).

दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील ट्विट करत उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “सरकार तेच, वर्तनही तेच.” प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी म्हटलं, “काही दिवसांपूर्वी एका बलात्कार पीडितेने भाजप आमदाराविरोधात आवाज उठवला. त्यानंतर या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आता एक महिलेचा उमेदवारी अर्ज रोखण्यासाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या.”

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘हिंसा प्रदेश’ झाल्याचा आरोप केला.

“भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी लाठीकाठ्यांपासून बॉम्बपर्यंत वापर होऊन हिंसा भडकली. विशेष म्हणजे या परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासनावरही हल्ले होताना दिसत आहेत.

पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. त्यात ते फोनवर वरिष्ठांशी बोलताना परिस्थितीची माहिती देत आहेत. ते सांगत आहेत, “हे लोक विटा आणि दगडफेक करत आहेत. त्यांनी मला थोबाडीतही मारली. त्यांनी त्यांच्यासोबत बॉम्बही आणले आहेत. हे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. यात भाजप आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे.” हा व्हिडीओ ईटवाह जिल्ह्यातील आहे.

हेही वाचा :

VIDEO: “भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, तर 90 टक्के कोट्याधीश

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य

व्हिडीओ पाहा :

Rahul Gandhi and Priyanka Gandhi criticize Yogi government over violence in UP

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या