Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 06, 2021 | 2:27 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील बदलात 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तर सध्या मंत्री असलेल्या काहीजणांकडून मंत्रिपदाचा कार्यभार काढून घेतला जाणार आहे.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us

मुंबई : केद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यातच केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. अशावेळी हा काही छोटा नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळातील मोठा बदल असल्याचा दावा केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील बदलात 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तर सध्या मंत्री असलेल्या काहीजणांकडून मंत्रिपदाचा कार्यभार काढून घेतला जाणार आहे. (20 new faces likely to get opportunity in Union Cabinet)

नेत्यांना दिल्लीला येण्याचं निमंत्रण

काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. मंगळवारी ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती मिळतेय. शिंदे यांनीही आपला मध्य प्रदेश दौरा अर्ध्यात रोखत दिल्लीला रवाना झाले. दुसरीकडे महाराष्ट्रातूनही भाजपचे खासदार नारायण राणे यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांना भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्याची माहिती मिळतेय.

बिहार, उत्तर प्रदेशातील युतीच्या घटक पक्षांना संधी?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा फोकस मुख्यत्वे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशवर असल्याचं बोललं जात आहे. इथल्या नेत्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तर बिहारमध्ये जनता दल संयुक्त आणि लोक जनशक्ती पक्षाच्या पशुपती पारस गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपचं लक्ष खासकरुन उत्तर प्रदेशवर राहण्याची शक्यता आहे. भाजपचे सहयोगी पक्ष अपना दल आणि निषाद पार्टीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. या पक्षाच्या नेत्यांनी नुकतीच भाजपच्या केंद्रीय नेृत्वाची भेट घेतली होती.

कोणाकोणाची वर्णी लागणार

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल

शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली?; जेडीयू, अपना दलची कॅबिनेटमध्ये समावेशाची शक्यता

20 new faces likely to get opportunity in Union Cabinet

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI